breaking-newsराष्ट्रिय

#Arogya Setu:जगभरातील APPSला ‘आरोग्य सेतु’ची टक्कर

नवी दिल्ली : देशभरात पसरणाऱ्या कोरोना व्हायरसपासून बचाव करण्याबाबत माहिती देणारं आरोग्य सेतु ऍप मे महिन्यात जगातील टॉप 10 डाऊनलोड करण्यात आलेल्या ऍपपैकी एक बनलं आहे. कोरोना व्हायरसला ट्रॅक करणाऱ्या या सरकारी ऍपमुळे देशात वाढत्या कोरोना संसर्गामध्ये आरोग्य सेतु ऍपवरील लोकांचा विश्वास वाढताना दिसतोय. नीति आयोगचे प्रमुख कार्यकारी अधिकारी अमिताभ कांत यांनी शनिवारी याबाबत माहिती दिली.

अमिताभ कांत यांनी याबाबत ट्विट केलं आहे. ‘आरोग्य सेतु ऍप लॉन्च करण्यात आल्यानंतर मे महिन्यात, सलग दुसऱ्या महिन्यात प्रमुख  10 डाऊनलोड करण्यात आलेल्या मोबाईल ऍपपैकी एक ठरलं आहे. भारतात कोविड-19 या साथीच्या रोगाचा प्रतिकार करण्यासाठी भारताने तंत्रज्ञानाचा प्रभावीपणे उपयोग करुन जगात नेतृत्व केलं.’ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 14 एप्रिल रोजी देशाला संभोधित करताना लोकांना हे आरोग्य सेतु ऍप डाऊनलोड करण्याचं आवाहन केलं होतं.

Amitabh Kant✔@amitab hk87

#AarogyaSetu one of the top 10 downloaded mobile apps globally since launch, second month in running. India has led the way in effectively leveraging technology to combat the COVID-19 pandemic.

View image on Twitter
Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button