breaking-newsक्रिडाताज्या घडामोडी

IPL2020: मुंबई आणि बंगळुरू यांच्यात सामना रंगणार

अबुधाबी – रोहित शर्मा दुखापतग्रस्त असल्यामुळे सलग तिसऱ्या लढतीला मुकण्याची शक्यता आहे. मुबंई इंडियन्स व रॉयल चॅलेंजर्स बँगलोर संघांचे लक्ष्य इंडियन प्रीमियर लीगच्या (आयपीएल) प्ले-ऑफमध्ये स्थान मिळविण्यावर केंद्रित झाले आहे. उभय संघांदरम्यान बुधवारी चुरशीची लढत होण्याची अपेक्षा आहे.
मुंबई संघाला यापूर्वीच्या लढतीत राजस्थान रॉयल्सविरुद्ध ८ गड्यांनी पराभव स्वीकारावा लागला होता. मुंबईच्या खात्यावर १४ गुणांची नोंद आहे. विराटच्या नेतृत्वाखालील आरसीबीच्या खात्यावरही १४ गुण आहेत. त्यांना रविवारी चेन्नई सुपरकिंग्सविरुद्ध पराभव स्वीकारावा लागला होता. बुधवारी विजय मिळविणाऱ्या संघाचे प्ले-ऑफमधील स्थान निश्चित होईल.

रोहितचा फिटनेस चर्चेचा विषय आहे. स्नायूच्या दुखापतीमुळे तो यापूर्वीच्या दोन सामन्यांना मुकला. मुंबई इंडियन्सच्या कर्णधाराने सोमवारी नेट्समध्ये सराव केला. योगायोगाने त्याच दिवशी ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी जाहीर झालेल्या संघात त्याची निवड झाली नाही.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button