breaking-newsताज्या घडामोडीराष्ट्रिय

राज्यात काल दिवसभरात १६ हजार ४२९ नव्या कोरोना रुग्णांची नोंद

  • मुंबईत १,७८८, पुण्यात तब्बल ४,२७३ नवे कोरोना रुग्ण

मुंबई – भारताने जगातील सर्वाधिक कोरोनाबाधितांच्या संख्येत ब्राझीलला मागे टाकले आहे. त्यामुळे आता आपल्यापुढे केवळ अमेरिका आहे. देशात दररोज हजारोंच्या संख्येने वाढणारी रुग्णसंख्या चिंता वाढवणारी आहे. देशात कोरोनाचा सर्वाधिक फटका महाराष्ट्राला बसलाय. महाराष्ट्रात काल दिवसभरात १६ हजार ४२९ नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली, तर उपचार सुरू असलेल्या ४२३ रुग्णांचा मृत्यू झाला. यासह राज्यातील एकूण कोरोनाबाधितांचा आकडा ९ लाख २३ हजार ६४१ इतका झाला आहे. यापैकी २ लाख ३६ हजार ९३४ रुग्णांवर सध्या उपचार सुरू आहेत. तर कोरोनामुळे आतापर्यंत राज्यातील २७ हजार २७ जणांनी आपले प्राण गमावले आहेत. दरम्यान, काल दिवसभरात कोरोनातून बरे झालेले १४ हजार ९२२ रुग्ण घरी परतले. त्यामुळे कोरोनावर यशस्वी मात केलेल्या लोकांचा राज्यातील आकडा ६ लाख ५९ हजार ३२२ इतका झाला आहे.

महाराष्ट्रात पुणे जिल्ह्यातून दररोज नव्या रुग्णांची धडकी भरवणारी आकडेवारी समोर येते. सोमवारी दिवसभरात जिल्ह्यात तब्बल ४ हजार २७३ नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली. तर ७६ कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला. यासह जिल्ह्यातील एकूण बाधितांची संख्या आता १ लाख ९७ हजार २८६ वर पोहोचली असून कोरोनाबळींचा आकडा ४ हजार ६५१ इतका झाला आहे. काल आढळलेल्या ४ हजार २७३ रुग्णांपैकी पुणे शहरातील २ हजार ५३ आणि पिंपरी-चिंचवडमधील १ हजार २५९ रुग्ण आहेत. त्यामुळे पुणे शहरातील एकूण रुग्णसंख्या आता १ लाख ७ हजार ९५८ इतकी झाली आहे, तर पिंपरी-चिंचवडमधील एकूण रुग्णांचा आकडा ५३ हजार ४९३वर पोहोचला आहे.

महाराष्ट्राची राजधानी मुंबईत सोमवारी १ हजार ७८८ नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली, तर ३१ कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला. यासह मुंबईतील एकूण कोरोना रुग्णांची संख्या १ लाख ५७ हजार ४१० वर पोहोचली आहे. यापैकी २५ हजार १४४ रुग्णांवर सध्या उपचार सुरू आहेत. तसेच मुंबईत आतापर्यंत १ लाख २५ हजार १९ जणांनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे, तर ७ हजार ८९७ जणांनी कोरोनामुळे आपला जीव गमावला आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button