breaking-newsताज्या घडामोडीपुणे

हर्षवर्धन पाटलांची कन्या निवडणुकीच्या रिंगणात

पुणे – काँग्रेसचे वरिष्ठ नेते आणि माजी सहकारमंत्री नेते हर्षवर्धन पाटील यांची कन्या अंकिता पाटील यांचा सक्रिय राजकारणात प्रवेश झाला आहे. पुणे जिल्ह्याच्या इंदापूर तालुक्यातील बावडा-लाखेवाडी जिल्हा परिषद गटाच्या पोटनिवडणुकीसाठी अंकिता यांना काँग्रेसकडून उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. त्यामुळे आता बावड्याच्या पाटील घराण्याची तिसरी पिढी राजकारणात सक्रिय झाली आहे.

पाटील कुटुंबात माजी खासदार दिवंगत शंकरराव पाटील यांच्यानंतर त्यांचे पुतणे हर्षवर्धन पाटील यांचा राजकारणात प्रवेश झाला होता. त्यानंतर आता त्यांच्या कन्येच्या प्रवेशामुळे पाटील घराण्याची तिसरी पिढी राजकारणात दाखल झाली आहे. गुरुवारी सकाळी 11 वाजता अंकिता पाटील आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. विशेष म्हणजे लोकसभा निवडणुकीत सुप्रिया सुळेंसाठी धावपळ करणाऱ्या अंकिता पाटील यांच्या उमेदवारीला राष्ट्रवादीनेही पाठींबा जाहीर केला आहे.

काँग्रेसच्या सदस्या आणि हर्षवर्धन पाटील यांच्या मातोश्री रत्नप्रभादेवी पाटील यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या बावडा-लाखेवाडी जिल्हा परिषद गटाच्या जागेवर 23 जून रोजी पोटनिवडणूक होत आहे. त्यासाठी काँग्रेसकडून अंकिता पाटील यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button