TOP Newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

चिखली प्रभाग-२ मध्ये खेळ रंगला पैठणीचा ; महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

विनायक (आबा) मोरे स्पोर्ट्स फाउंडेशन, श्रीराम वरदायिनी सखी मंचतर्फे आयोजन

पिंपरी l प्रतिनिधी
विनायक (आबा) मोरे स्पोर्ट्स फाउंडेशन आणि श्रीराम वरदायिनी सखी मंच यांच्या माध्यमातून मोरेवस्ती, सानेवस्ती, चिखली येथे ‘न्यू होम मिनिस्टर, खेळ रंगला पैठणीचा’ हा कार्यक्रम घेण्यात आला. या कार्यक्रमात महिलांनी सहभाग घेत विविध आकर्षक बक्षिसे जिंकली. तसेच माउली हाऊसिंग सोसायटी, राजगड पार्क एक ते सात, मोरेवस्ती, सानेवस्ती आणि परिसरातील पुरुष व महिलांनी या कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद नोंदवला.


या कार्यक्रमात प्रथम पारितोषिक पैठणी साडी, द्वितीय पारितोषिक सोन्याची नथ, तृतीय पारितोषिक जोडवी, चौथे पारितोषिक गॅस शेगडी, उत्तेजनार्थ पारितोषिक मिक्सर, कुकर, इस्त्री, पोळी डबा, तवा, टिफिन बॅग आणि इतर अनेक वस्तू देण्यात आल्या. खेळाचा आनंद घेत घरगुती वापराच्या उपयोगी वस्तू मिळाल्याने महिलांमध्ये आनंदाचे वातावरण होते.
आगामी महापालिका निवडणुकीत विनायक (आबा) मोरे अथवा सोनम विनायक (आबा) मोरे यांच्यापैकी कुणालाही उमेदवारी मिळाली तरी त्यांना भरघोस मतांनी निवडून देणार. विनायक (आबा) मोरे यांनी मोरेवस्ती, सानेवस्ती परिसरातील लोकांसाठी काम केले आहे. पुढेही ते लोकहितासाठी कार्यरत राहतील, अशा भावना स्थानिक महिलांनी यावेळी व्यक्त केल्या.


परिसरातील पुरुष व महिला आणि युवकांनी या कार्यक्रमासाठी उत्स्फूर्त प्रतिसाद नोंदवला. जनहितासाठी मिळून काम करूयात, असे आवाहन करीत विनायक (आबा) मोरे यांनी उपस्थितांचे आभार मानले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button