breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

अल्पवयीन मुलींवरील अत्याचाराच्या विरोधात राष्ट्रवादीचा आक्रोष

पिंपरी – हिंजवडी येथील ऊसतोड  कामगारांच्या अल्पवयीन मुलीवरील बलात्काराच्या घटनेच्या निषेधार्थ पिंपरी-चिंचवड शहर राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने आज शनिवारी (दि. 22) पिंपरीत आंदोलन करण्यात आले. आरोपींच्या तात्काळ मुसक्या आवळण्याची मागणी यावेळी आंदोलकांनी केली.

 

हिंजवडी येथे चार दिवसांपूर्वी दोन अल्पवयीन मुलींवर बलात्कार झाला. यामध्ये एका मुलीचा मृत्यू झाला. या घटनेचा सर्वत्र निषेध केला जात आहे. पिंपरीतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा चौकात राष्ट्रवादी काँग्रेसने आंदोलन करुन या घटनेचा आज निषेध केला.

 

शहराध्यक्ष संजोग वाघेरे, महिला अध्यक्षा वैशाली काळभोर, पक्ष प्रवक्ते फजल शेख, कविता खराडे, पुष्पा शेळके, मनिषा गटकळ, दिपाली देशमुख, पौर्णिमा पालेकर, शिल्पा बिडकर, आशा शिंदे, शमा कोरबू, मिना कोरडे, सुप्रिया पवार, सविता धुमाळ, मंगल ढगे, निर्मला माने, विजया काटे, बाळासाहेब पिल्लेवार, सर्जेराव जगताप, यतिन पारेख, रंजना कराळे, हमीद शेख, विजय दळवी आंदोलनात सहभागी झाले होते.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button