breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्र

हर्षवर्धन जाधव यांच्या घरातील वाद पोलीस ठाण्यात, आईने दिली सुनेविरोधात तक्रार

औरंगाबाद | महाईन्यूज | प्रतिनिधी 

कन्नडचे विधानसभा मतदार संघाचे माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांच्या कुटुंबातील वाद चव्हाट्यावर आला आहे. जाधव यांच्या आई तेजस्विनी जाधव आणि पत्नी संजना जाधव यांच्यात कुरबु-या सुरू झाल्याने तेजस्विनी जाधव यांनी आपली सून संजना यांच्याविरोधात शिवीगाळ केल्याची तक्रार औरंगाबादच्या क्रांती चौक पोलीस ठाण्यात केली आहे.

हर्षवर्धन जाधव यांच्याविरोधात अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल झाला होता. त्यांच्यावर एका व्यक्तीला जातीवाचक शिवीगाळ केल्याचा आरोप आहे. पीडित व्यक्तीची हर्षवर्धन जाधव यांच्या जमिनीच्या प्लॉट शेजारी टपरी होती. ती टपरी काढण्यासाठी हर्षवर्धन जाधव यांनी जातीवाचक शिवीगाळ करत धमकी दिल्याचा आरोप पीडित व्यक्तीने केला आहे. त्याने याविरोधात पोलिसांकडे लेखी तक्रार देत जाधव यांच्यावर अॅट्रॉसिटी गुन्हा दाखल करण्याची मागणी केली होती. त्यानंतर पोलिसांनी हर्षवर्धन जाधव यांच्यावर गुन्हा दाखल केला.

दरम्यान, हर्षवर्धन जाधव यांच्यावर अॅट्रॉसिटीचा गुन्हा हा त्यांचे सासरे आणि भाजप नेते रावसाहेब दानवे यांच्यामुळे करण्यात आल्याचा आरोप तेजस्विनी जाधव यांनी केला. त्यामुळे रावसाहेब दानवे यांची मुलगी आणि हर्षवर्धन जाधव यांच्या पत्नी संजना जाधव आणि तेजस्विनी जाधव यांच्यात वाद निर्माण झाला. हा वाद आता विकोपाला गेला असून थेट पोलीस ठाण्यात धडकला आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button