breaking-newsराष्ट्रिय

फाजील आत्मविश्वास ! सेल्फीसाठी गळ्यात घातलेल्या अजगराने फास आवळला

कोलकाता : कोलकात्यातील जलपाईगुडी येथील व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. पश्चिम बंगालमधल्या एका वनरक्षकाने अजगरासोबत सेल्फी घेण्याचे धाडस केले. पण या वनरक्षकाचा हा फाजिल आत्मविश्वास त्याला चांगलाच भोवला.

अखेरीस इतर गावकऱ्यांच्या मदतीने अजगराच्या तावडीतून स्वत:ची सुटका करून घेतली. हा अजगर स्थानिकांच्या बकऱ्या किंवा इतर प्राण्यांना गिळून फस्त करायचा. यामुळे गावात दहशतीचे वातावरण होते. अजगराच्या दहशतीखाली असलेल्या गावकऱ्यांनी त्याला पकडून जंगलात सोडण्याची विनंती वन अधिकाऱ्याला केली.

अजगराला पकडण्यासाठी वनरक्षक गावात पोहोचला. त्याने अजगराला पकडले. पकडलेल्या अजगराला सोडून न देता वनरक्षकाने तो गळ्यात धरला. सेल्फी घेण्यासाठी गावकऱ्यांनी गर्दी केली.

गळ्याभोवती असलेल्या अजगराने आपली पकड अधिक मजबूत करून त्यांच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. घाबरलेल्या वनरक्षकाच्या मदतीला सुदैवाने एक वनअधिकारी धावून आला आणि त्याने या वनरक्षकाचे वाचवले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button