breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

Mahesh Landge VS NCP : महापालिका राखण्यासाठी ‘एमडी ब्रिगेड’ मैदानात; संघटनात्मक पातळीवर मोर्चेबांधणी

राष्ट्रवादी काँग्रेससह महाविकास आघाडीला रोखण्याची तयारी

महेश लांडगेंकडून भाजपा पक्षश्रेष्ठींच्या अपेक्षा उंचावल्या

पिंपरी । महाईन्यूज । प्रतिनिधी

राज्यातील सत्तेत असलेल्या राष्ट्रवादीला  पिंपरी-चिंचवडमधील संघटनात्मक बांधणीला अद्याप मुहूर्त मिळला नाही. मात्र, तत्पूर्वी भाजपाने शहराध्यक्ष तथा आमदार महेश लांडगे यांची टीम अर्थात ‘एमडी ब्रिगेड’ तयार केली आहे. आगामी महापालिका निवडणुकीत वर्चस्व कायम ठेवण्यासाठी भाजपाने आतापासूनच मोर्चबांधणी सुरू केली आहे.

पिंपरी-चिंचवड महापालिकेची आगामी सार्वत्रिक निवडणूक अत्यंत रंगतदार होणार आहे. राज्यातील नव्या समीकरणानुसार महाविकास आघाडी विरुद्ध भाजपा असा सामना रंगणार असल्याचे दिसून येत आहे.

उपमुख्यमंत्री आणि पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांचा ‘विशेष’ जिव्‍हाळा असलेले शहर म्हणून पिंपरी-चिंचवडची ओळख आहे. त्यामुळे ही महापालिका भाजपाच्या हातातून काढून घेण्यासाठी राष्ट्रवादी आणि पर्यायाने महाविकास आघाडी प्रयत्न करणार यात शंका नाही. पण, जनाधार असतानासुद्धा विरोधी बाकावर बसावे लागलेल्या माजी मुख्यमंत्री तथा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी पिंपरी-चिंचवड शहर भाजपाची सूत्रे आमदार महेश लांडगे यांच्याकडे सोपवली आहेत. त्यामुळे राष्ट्रवादीला रोखणे सोपे होईल, असा भाजपाचा भरोसा आहे.

कार्यकारिणीमध्ये घातला नव्या-जुन्यांचा मेळ…

२०१७ मध्ये भारतीय जनता पक्षाची सत्ता पिंपरी-चिंचवड महापालिकेत आली. त्यापूर्वीपासूनच शहर भाजपामध्ये आमदार लक्ष्मण जगताप गट, आमदार महेश लांडगे गट, नवा, जुना आणि निष्ठावंत असे गट निर्माण झाले होते. त्यामुळे अनेकदा महापालिका कारभार करताना सत्ताधारी भाजपामध्ये मतभिन्नता दिसत होती. मात्र, आमदार महेश लांडगे यांच्या अध्यक्षपदाखाली स्थापन करण्यात आलेल्या नवीन कार्यकारिणीमध्ये नव्या-जुन्यांचा मेळ घालण्यात आला आहे. यामध्ये बारा उपाध्यक्ष, सोळा चिटणीस, पंधरा जिल्हा कार्यकारिणी सदस्य अशी एकूण ७४ जणांची यादी जाहिर करण्यात आली. यामध्ये अमोल थोरात, मोरेश्वर शेडगे, राजू दुर्गे यांच्याकडे संघटन सरचिटणीस आणि सरचिटणीस पदाची जबाबदारी सोपवली आहे.  

        पिंपरी-चिंचवडच्या राजकारणाचा केंद्रबिंदू महेश लांडगे…

पिंपरी-चिंचवड महापालिकेत भाजपाची सत्ता आहे. मात्र, राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आहे. त्यामुळे औद्योगिक नगरी असलेल्या पिंपरी-चिंचवड महापालिकेची धूरा पर्यायायाने आमदार महेश लांडगे यांच्याकडे आहे. राज्यातील महाविकास आघाडीमुळे स्थानिक राष्ट्रवादीचे ‘बाहुबळ’ वाढले असले, तरी पिंपरी-चिंचवडच्या राजकारणाचा केंद्रबिंदू म्हणून महापालिकेली सत्ताधारी पक्षाचे शहराध्यक्ष महेश लांडगे यांचे नेतृत्त्व समोर येत आहे. विशेष म्हणजे, राज्यातील विरोधी पक्षात असलेल्या भाजपाचे शहरपातळीवर संघटनात्मक नेतृत्त्व स्वीकारुन महेश लांडगे यांनी घेतलेल्या ‘रिस्क’चे पक्षपातळीवर भविष्यातील सत्तेच्या काळात ‘चीज’ होईल, अशी ‍टीप्पण्णी राजकीय जाणकार करीत आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button