breaking-newsराष्ट्रिय

हजारो कोटींच्या बँक घोटाळयातील आरोपी नीरव मोदीचा पत्ता सापडला

पंजाब नॅशनल बँकेत हजारो कोटींचा घोटाळा करुन फरार झालेला मुख्य आरोपी नीरव मोदी इंग्लंडमध्ये वास्तव्याला आहे. ब्रिटीश यंत्रणांनी भारत सरकारला ही माहिती दिली. परराष्ट्र राज्यमंत्री व्ही.के.सिंह यांनी राज्यसभेमध्ये ही माहिती दिली. मँचेस्टरच्या नॅशनल सेंट्रल ब्युरोने नीरव मोदी इंग्लंडमध्ये राहत असल्याची माहिती दिली आहे असे व्ही.के.सिंह यांनी सांगितले.

नीरव मोदीचे भारताकडे प्रत्यार्पण करण्यासंदर्भात केंद्र सरकारने ऑगस्ट २०१८ मध्ये ब्रिटन सरकारला विनंतीचे दोन अर्ज पाठवले होते. एक अर्ज सीबीआय़च्या तर दुसरा अर्ज अंमलबजावणी संचलानलयाकडून करण्यात आला होता. हे दोन अर्ज ब्रिटन सरकारच्या विचाराधीन असल्याची माहिती सिंह यांनी दिली.

भारत सरकारच्या परराष्ट्र मंत्रालयाने जून महिन्यात अनेक युरोपियन देशांना पत्र लिहून नीरव मोदीचा ठावठिकाणा शोधून काढण्यासाठी मदत मागितली होती. नीरव मोदी पंजाब नॅशनल बँकेतील ११,३०० कोटीपेक्षा जास्त रक्कमेच्या घोटाळयातील मुख्य आरोपी आहे.

दरम्यान या घोटाळयातील दुसरा आरोपी मेहुल चोक्सीने ४१ तासांचा विमान प्रवास करुन भारतात परतणे अशक्य असल्याचे न्यायालयात सांगितले आहे. ईडीने ११ जून रोजी मुंबईतील पीएमएलए कोर्टात फरारी आर्थिक गुन्हेगार अध्यादेशानुसार नीरव मोदी आणि मेहुल चोक्सी या दोघांविरोधात दोन स्वतंत्र अर्ज दाखल केले आहेत. या अर्जावरील सुनावणीत दरम्यान मेहुल चोक्सीने वकिलांमार्फत ३४ पानी उत्तर दिले आहे. यात मेहुल चोक्सी म्हणतो, मी पंजाब नॅशनल बँकेला थकबाकी फेडण्यासंदर्भात प्रस्ताव दिला होता. यासंदर्भात अजूनही पत्रव्यवहार सुरु आहे. मात्र, ईडीने ही बाब न्यायालयापासून जाणीवपूर्वक लपवून ठेवली, असा दावा त्याने केला.
Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button