breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्रराजकारण

महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवटीची शिफारस, शिवसेना सुप्रीम कोर्टात

नवी दिल्ली / महाराष्ट्रातील सत्तास्थापनेचा तिढा सुटत नसल्याने अखेर राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी केंद्राकडे राष्ट्रपती राजवटीची शिफारस केली आहे. राज्यपालांनी सत्तास्थापनेसाठी सर्वात आधी मोठा पक्ष असलेल्या भाजपला सत्तास्थापनेचे निमंत्रण दिले होते. मात्र भाजपने त्याला नकार दिला.

त्यानंतर राज्यपालांनी दुसऱ्या क्रमाकांचा पक्ष शिवसेनेला आवताण दिले होते. शिवसेनेने काल रात्री राज्यपालांची भेट घेऊन, सत्तास्थापनेचा दावा केला. मात्र आवश्यक संख्याबळ दाखवण्यासाठी राज्यपालांकडे वेळ मागितला. पण राज्यपालांनी त्याला नकार दिला. मग राज्यपालांनी राष्ट्रवादी काँग्रेसला निमंत्रण दिले. राष्ट्रवादी काँग्रेसला आज रात्री 8.30 पर्यंतची मुदत दिली आहे. मात्र त्याआधीच राज्यपालांनी राष्ट्रपती राजवटीची शिफारस केली आहे.

दरम्यान, एकीकडे राज्यावर राष्ट्रपती राजवटीच्या हालचाली सुरु असताना, शिवसेनेने कोर्टाचा दरवाजा ठोठावला आहे . शिवसेनेने सत्तास्थापनेच्या दाव्यासाठी राज्यपालांकडे वेळ वाढवून मागितला होता. मात्र राज्यपालांनी त्याला नकार दिला. शिवसेनेने त्यावर आक्षेप घेत, सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली. शिवसेनेने त्यासाठी सुप्रीम कोर्टातील वकील आणि काँग्रेस नेते- माजी मंत्री कपिल सिब्बल यांच्याशी फोनवरुन चर्चा केल्याची माहिती सूत्रांनी दिली.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button