breaking-newsराष्ट्रिय

सोहराबुद्दीन शेख प्रकरणात CBI ला नेत्यांना अडकवायचे होते – सीबीआय न्यायालय

सोहराबुद्दीन शेख बनावट चकमक प्रकरणात सीबीआयला नेत्यांना अडकवायचे होते. देशाच्या मुख्य तपास यंत्रणेला या प्रकरणात सत्य शोधण्याऐवजी आधीच सिद्धांत मांडून राजकीय नेत्यांना अडकवण्याचा उद्देश होता असे मुंबईतील सीबीआयच्या विशेष न्यायालयाने आपल्या निकालात म्हटले आहे.

सोहराबुद्दीन शेख त्याची बायको कौसर बी तसेच तुलसीराम प्रजापती यांच्या कथित बनावट चकमक प्रकरणात सीबीआयच्या विशेष न्यायालयाने मागच्या आठवडयात सबळ पुराव्याअभावी सर्वच्या सर्व २२ आरोपींची सुटका केली. सोहराबुद्दीन शेख बनावट चकमक प्रकरणात सत्यापर्यंत पोहोचण्याऐवजी सीबीआयचे दुसरेच काही तरी सुरु होते असे विशेष सीबीआय न्यायाधीश एस.जे.शर्मा यांनी आपल्या निकालपत्रात म्हटले आहे.

न्यायाधीशांनी २१ डिसेंबर रोजी गुजरात, राजस्थान आणि आंध्र प्रदेशच्या २२ आरोपींची सुटका केली. त्यात २१ ज्यूनियर स्तराचे पोलीस होते. पोलिसांनी तिघांचे अपहरण करुन त्यांच हत्या केली असा सीबीआयचा दावा होता.

सोहराबुद्दीन शेख आणि त्याची बायको कौसर बी तसेच या प्रकरणातील मुख्य साक्षीदार तुलसीराम प्रजापती या तिघांना चकमकीत ठार मारण्यात आले होते. 2005 मध्ये सोहराबुद्दीन व त्याच्या पत्नीचा चकमकीत मृत्यू झाला होता. तर 2006 मध्ये तुलसीराम प्रजापतीचा चकमकीत मृत्यू झाला होता. प्रजापती हा सोहराबुद्दीन चकमक प्रकरणातील साक्षीदार होता. या प्रकरणी मुंबईतील सीबीआयच्या विशेष न्यायालयात खटला चालवण्यात आला.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button