breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

#War Against Coroana: ‘मदत नव्‍हे कर्तव्य’उपक्रम : ‘जनतेचा मेंबर’आमदार सुनील शेळके धडपड महाराष्ट्रात ‘एक नंबर’

– लोणावळ्यात गरजू कुटुंबांना मोफत जीवनावश्यक वस्तुंचा संच

– किमान महिनाभर पुरेल इतका धान्यसाठा दिल्याने कष्टकऱ्यांकडून कौतूक

लोणावळा । महाईन्यूज । प्रतिनिधी

‘समाजकार्यासाठी त्यांनी कसली कंबरं आणि सुनील आण्णा शेळके दादा एक नंबर’या गीताने महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यात आमदार सुनील शेळके यांना पोहोचवले. या गाण्यातील ओळींना साजेसे कामही शेळके यांनी मतदार संघात सुरू केले आहे. मावळ तालुका कोरोनामुक्त ठेवायचा हा निर्धार करुन  ‘मदत नव्‍हे कर्तव्य’, सोशल डिस्टंसिंगचे रोलमॉडेल, प्रशासनाला सहकार्य करणार…कोरोनाला हद्दपार करणार, गाव-खेड्यांत आणि पाड्यांवरील नागरिकांमध्ये जनजागृती, मोफत भाजीपाला वाटप आदी उपक्रमांमुळे आमदार शेळके यांची कोरोनाविरोधातील धडपडही महाराष्ट्रात ‘एक नंबर’ दिसत आहे.

          कोरोना पार्श्वभूमीवर लॉकडाऊनच्या गंभीर परिस्थितीत सर्वसामान्यांचा रोजगार बुडाला आहे. त्यांच्यापुढे उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला आहे. सामाजिक बांधिलकी आणि कर्तव्य म्हणून लोणावळा येथे मावळचे आमदार सुनील शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली जीवनावश्यक वस्तुंचा संच वाटपाची सुरूवात करण्यात आली. किमान महिनाभर पुरेल इतके राशन यामुळे गरजु कुटुंबांना मिळणार आहे. तालुक्यातील सुमारे २० हजार गरजु कुटुंबांना राशन वाटप करण्याचा संकल्प करण्यात आला आहे.लोणावळ्यातील गरजु कुटुंबाना ‘मदत नव्हॆ कर्तव्य’ या उपक्रमांतर्गत जीवनावश्यक वस्तूंचा संच घरपोच देण्यात येत आहे. त्यामुळे कष्टकऱ्यांकडून या उपक्रमांचे कौतूक होत आहे.

 याप्रसंगी तहसीलदार मधुसूदन बर्गे, सचिन पवार मुख्याधिकारी लोणावळा नगरपरिषद, गजानन टोम्पे डि.वाय.एस.पी., मनोज यादव पो. निरीक्षक लोणावळा, लोणावळा नगरपरिषदेच्या नगरसेविका शादान चौधरी, अंजली बाळासाहेब कडू, सेजल परमार, अपर्णा बुटाला, जयश्री आहेर, आरोही तळेगावकर, कल्पना आखाडे, नगरसेवक भरत हारपुडे,

निखिल कविश्वर, प्रमोद गायकवाड, मा. नगरसेवक बाळासाहेब कडू, जीवन गायकवाड अध्यक्ष रा.काॅ. लोणावळा, प्रकाश गवळी सामाजिक का., दत्तात्रय गवळी मा. उपनगराध्यक्ष,

सुरेश ढमढेरे, दत्तात्रय दळवी काॅग्रेस युवक अध्यक्ष लोणावळा, भारत चिकणे म.न.से अध्यक्ष लोणावळा, सनी पाळेकर युवक रा. काॅ. अध्यक्ष,  मुकेश परमार, उमेश तारे, मंगेश गायकवाड, वैभव देशपांडे, मनोज लवूळकर, संयोगिता साबळे महिला अध्यक्ष रा.काॅ.लो., सुन्नी मुस्लिम कमिटी आदी उपस्थित होते.

तालुक्यात कोरोनाला शिरकाव करु द्यायचा नाही…

जागतिक महामारी असलेल्या कोनोना संपूर्ण देशात हाहाकार माजवला आहे. मात्र, मावळ तालुक्यातील सूज्ञ नागरिक आणि प्रशासनाच्या अचूक नियोजनामुळे अद्यापपर्यंत कोरोनाचा एकही रुग्ण तालुक्यात आढलेला नाही. यापुढील लढाईही आपण यशस्वीपणे लढायची आहे. प्रशासनाला सहकार्य करुन कोरोनाला हद्दपार ठेवायचे आहे, असे आवाहन आमदार सुनील शेळके यांनी यावेळी केले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button