breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

स्वेच्छा निवृत्तीच्या सर्व रक्कमा द्या, अन्यथा फसवणूकीचे गुन्हे दाखल करण्याचा कामगारांचा इशारा

एचए व्यवस्थापनाविरोधात संतप, 250 कामगारांना स्वेच्छा निवृत्ती योजने कार्यमुक्त

पिंपरी|महाईन्यूज|प्रतिनिधी|

हिंदुस्थान एंटिबायोटिक्‍स (एचए) कंपनीकडून निरनिराळ्या देणींपोटी दिलेल्या धनादेशाच्या रकमा मंजूर झाल्या नसल्याने तसेच स्वेच्छा निवृत्तीच्या दीडपटऐवजी एकपटच रक्कम हातावर टेकविल्याने गुरुवारी कामगारांमधील तीव्र नाराजी पुन्हा उफाळून आली. त्याबाबत कामगारांनी जाब विचारल्यावर दोन दिवसांत पैसे मंजूर केले जातील, असे व्यवस्थापनाने स्पष्ट केले. दरम्यान, प्रलंबित पैसे न मिळाल्यास पोलीसांकडे फसवणूकीचे गुन्हे दाखल केले जातील, असा इशारा कामगारांनी दिला आहे.

एचए कंपनीमध्ये व्यवस्थापनाने 250 कामगारांना स्वेच्छा निवृत्ती योजने (व्हीआरएस) अंतर्गत मंगळवारी दुपारी सव्वा चार वाजण्याच्या सुमारास कार्यमुक्त केले. त्यावेळेस, कामगारांना व्हीआरएस, भविष्यनिर्वाह निधी (पीएफ) आणि थकीत वेतनाचे धनादेश देण्यात आली. मात्र, दुसऱ्या दिवशी सकाळी काही कामगारांनी धनादेश बँकेत भरले असता त्यांचे पैसे मंजूर झाले नसल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. तसेच सुमारे 105 कामगारांना व्हीआरएसपोटी दीडपट रक्कम मिळण्याऐवजी एकपटच रक्कम देण्यात आल्याचे लक्षात आले. त्यामुळे, कामगार प्रतिनिधींनी गुरुवारी कंपनीत जाऊन त्याबाबत व्यवस्थापनाला जाब विचारला. कंपनीचे डीजीएम (आर्थिक) सी.व्ही.पूरम आणि वरिष्ठ (पर्सोनेल) व्यवस्थापिका सुनीता शिवतारे यांनी त्यावेळेस 2 दिवसांत कामगारांना पैसे दिले जातील, असे आश्‍वासन दिले.

एचए मजदूर संघाचे सरचिटणीस संजय भोसले, माजी सरचिटणीस सुनील पाटसकर आणि अरुण बोऱ्हाडे म्हणाले,”250 पैकी सुमारे 105 कामगारांना व्यवस्थापनाने “पीएफ’,”व्हीआरएस’ रक्कम आणि थकीत वेतनापोटी एकत्रित धनादेश दिले. मात्र, त्यामध्ये, या कामगारांना व्हीआरएसपोटी मिळणाऱ्या दीडपट रक्कमेऐवजी केवळ एकपटच रक्कम मिळाली असल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे, त्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. ग्रॅच्युएटी, रजा रोखीकरण, वैद्यकीय देयके, बोनस आदी पैसे देखील कामगारांना देणे अद्याप बाकी आहे. व्हीआरएसच्या दिवशी दिलेल्या धनादेशांसाठी आवश्‍यक रक्कमांनाही व्यवस्थापनाने मंजुरी दिली नव्हती. येत्या 2 दिवसांत कामगारांना पैसे न मिळाल्यास आम्ही पोलीसांकडे व्यवस्थापनाविरोधात फसवणूकीचा गुन्हा दाखल करणार आहोत.”

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button