breaking-newsआंतरराष्टीयताज्या घडामोडी

बगदाद आंतरराष्ट्रीय विमानतळावर रॉकेट हल्ला…आठ जणांचा मृत्यू

इराकमधल्या बगदाद आंतरराष्ट्रीय विमानतळावर रॉकेट हल्ला झाला असूनल यामध्ये आठ जणांचा मृत्यू झाल्याची घटना घडली . अनेकजण जखमी झाले असून जखमींना उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे ..सध्या त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

अमेरिकेने गुरुवारी रात्री इराकची राजधानी बगदाद आंतरराष्ट्रीय विमानतळावर रॉकेट हल्ला केला. या हल्ल्यात टॉप कमांडर जनरल कासिम सुलेमानी यांचा मृत्यू झाला आहे. टॉप कमांडर आपल्या ताफ्यासह बगदादी विमानतळावर जात असताना अमेरिकेने रॉकेट हल्ला केला. या हल्ल्यात पॉप्‍युलर मोबलाइजेशन फोर्सचे डेप्युटी कमांडर अबू मेहदी अल मुहांदिस यांचाही मृत्यू झाल्याचं सांगितलं जात आहे . दरम्यान, सुलेमानी यांच्यावर इजराईलमध्ये रॉकेट हल्ला केल्याचा आरोप होता. अमेरिका बऱ्याच काळापासून सुलेमानी यांच्या शोधात होती.

बगदाद आंतरराष्ट्रीय विमानतळावर तीन रॉकेटचा हल्ला करण्यात आल्याने या ठिकाणी वाहनांना आग लागली. यामध्ये काही टॉप कमांडरचा मृत्यू झाला असून अनेक सैनिक जखमी झाले आहेत. बगदादमध्ये अमेरिकेच्या दूतावासावर इराण समर्थक मिलिशियाकडून नवीन वर्षाच्या पूर्वसंध्येला हल्ला करण्यात आला होता. अमेरिकेसोबत तणाव निर्माण झाल्यानंतर हा हल्ला करण्यात आला होता. त्याचचं प्रतिउत्तर म्हणून अमेरिकाचा हा हल्ला असल्याचं म्हटलं जात आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button