breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्र

शिवसेनेने.. या राज्यात भाजप विरोधात केले उमेदवार जाहीर

नवी दिल्ली – महाराष्ट्रात भाजप आणि शिवसेना एकत्र लोकसभा निवडणुक लढवित आहेत. मात्र इतर काही राज्यांत शिवसेना भाजपविरुद्ध उमेदवार उभे करणार आहे. पश्चिम बंगालमध्ये शिवसेना पहिल्यांदाच निवडणूक लढविणार आहे. याठिकाणी शिवसेनेने 15 जागांवर उमेदवार उभे केले असून त्यातल्या 11 नावांची घोषणा करण्यात आली आहे.

महाराष्ट्रात भाजप आणि शिवसेना गेल्या 30 वर्षांपासून एकत्र आहेत. 2014 च्या विधानसभा निवडणुकीत त्यांच्यात दुरावा निर्माण झाला. त्यामुळे गेली चार वर्ष दोघांची भांडणात गेली. आता 2019 च्या लोकसभा निवडणुकीत ते एकत्र आले आहेत.

महाराष्ट्राशिवाय इतर राज्यांमध्ये शिवसेनेचा फारसा प्रभाव नाही. मात्र पक्ष विस्तारासाठी शिवसेना गेल्या काही निवडणुकांमध्ये उमेदवार उभे करत असते. गोवा, गुजरात आणि उत्तरप्रदेशात शिवसेनेने या आधी निवडणुका लढविल्या आहेत. मात्र यावेळी पहिल्यांदाच शिवसेनेने पश्चिम बंगालमध्येही निवडणूक लढविण्याचं ठरवलं आणि 11 उमेदवारांची घोषणाही केली. आणखी 4 उमेदवारांची घोषणा शनिवारी करण्यात येणार आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button