breaking-newsआंतरराष्टीयताज्या घडामोडी

‘कोरोनो’ शी लढण्यासाठी मोदींनी मदतीसाठी उचललेल्या पावलाबद्दल चीनकडून मोदींची प्रशंसा…

कोरोना विषाणूशी तोंड देत असलेल्या चीनला भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मदतीचा हात पुढे केला आहे. त्यावरुन त्यांनी चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांना पत्र लिहिले होते. चीनने पंतप्रधान मोदींनी उचललेल्या पावलाबद्दल त्यांची प्रशंसा केली आहे. भारताने अशा परिस्थितीतही चीनबरोबर आपली मैत्रीची भावना दाखवली आहे, असे चीनने म्हटले आहे. 

चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते जेंग शुआंग म्हणाले की, कोरोना विषाणूशी लढण्यासाठी भारताच्या मदतीसाठी धन्यवाद आणि हे प्रशंसनीय पाऊल आहे. चीनमध्ये पसरलेल्या कोरोना विषाणूच्या प्रकोपादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शी जिनपिंग यांना रविवारी पत्र लिहून मदतीचा प्रस्ताव सादर केला होता. पंतप्रधान मोदींनी कोरोना विषाणूच्या प्रकोपावरुन चीनच्या लोकांबरोबर भारताची एकजुटता व्यक्त केली होती. 

शी जिनपिंग यांना लिहिलेल्या पत्रात पंतप्रधान मोदींनी चीनमध्ये कोरोना विषाणूच्या प्रकोपाशी सामना करण्यासाठी भारताच्या मदतीचा प्रस्ताव दिला होता. नुकताच भारताने सुमारे ४०० हून अधिक विद्यार्थ्यांना चीनच्या वुहान शहरातून भारतात परत आणले होते. 

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button