breaking-newsताज्या घडामोडीपुणे

काकडे कॉंग्रेसमध्ये प्रवेश करणार ; पुणे लोकसभा निवडणूक लढवणार?

पुणे – भारतीय जनता पक्षाचे सहयोगी खासदार संजय काकडे लवकरच कॉंग्रेसच्या तंबूत दाखल होणार आहेत. कॉंग्रेसमधील प्रवेशाची घोषणा खुद्द काकडे यांनीच पुण्यात केली. पक्ष प्रवेशाची घोषणा करताना ‘पक्ष श्रेष्ठी निर्णय घेतील, मात्र कॉंग्रेसची उमेदवारी मलाच मिळेल’,असा विश्वास व्यक्त करत  त्यांनी उमेदवारीच्या शर्यतीत असल्याचे स्पष्ट केले.

आगामी लोकसभा निवडणूकीच्या तोंडावर कॉंग्रेसमध्ये काकडे यांचा प्रवेश महत्वाचा ठरणार आहे. काकडे भाजपमधून बाहेर पडणार असल्याची चर्चा गेले काही दिवस सुरु होती. त्यातच, त्यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते अजित पवार यांची भेट घेतली. दरम्यान, त्यांनी भाजप नेत्यांवर जोरदार टिका देखील केली होती. त्यामुळे काकडे भाजपमधून बाहेर पडणार हे निश्चित होते. तसेच ते कॉंग्रेसच्या तिकीटावर लोकसभा निवडणुक लढविणार अशी शक्यता वर्तविण्यात येत होती. या घडामोडींच्या पार्श्वभूमूीवर काकडे यांनी कॉंग्रेसमध्ये प्रवेश करत असल्याचे जाहीर केले.

कॉंग्रेसचे माजी आमदार मोहन जोशी, संभाजी बिग्रेडचे प्रविण गायकवाड यावेळी उपस्थित होते. येत्या दोन दिवसांत कॉंग्रेसच्या पक्षात दाखल होण्याची शक्यता आहे. लोकसभा निवडणूकीत भाजपचे खासदार अनिल शिरोळे यांच्या पेक्षा पालकमंत्री गिरिष बापट यांच्या विरोधात निवडणूक लढवणे सोपे आहे असेही त्यांनी यावेळी सांगितले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button