breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

स्वातंत्र्यवीर सावरकरबद्दल आक्षेपार्ह लिखाण असणाऱ्या पुस्तकाचे दहन

पिंपरी|महाईन्यूज|प्रतिनिधी|

भारतीय जनता पार्टी पिंपरी-चिंचवड शहराच्या वतीने स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या बद्दल आक्षेपार्ह लिखाण असणाऱ्या पुस्तकाचे प्रतिकात्मक दहन करण्यात आले त्याचबरोबर या पुस्तकाचे प्रकाशन करणाऱ्या काॅंग्रेस पक्षाच्या सेवा दलाचाही तीव्र निषेध करण्यात आला. पिंपरी-चिंचवड महापौर उषा उर्फ माई ढोरे यांनीही काॅंग्रेस पक्षाच्या या विकृत मनोवृत्तीचा तीव्र शब्दात निषेध केला.

यावेळी शहर भाजपाच्या वतीने संपूर्ण महाराष्ट्र राज्यात या पुस्तकाच्या प्रदर्शन व विक्रीवर बंदी घालण्याची मागणी करण्यात आली अन्यथा या विरोधातील आंदोलन आणखीनच तीव्र करण्याचा इशारा देखील शहर भाजपाच्या वतीने राज्य सरकारला देण्यात आला.

याप्रसंगी राज्यसभेचे खा. अमर साबळे, आ. महेश लांडगे, प्रदेश सचिव उमा खापरे, संघटन सरचिटणीस अमोल थोरात, स्थायी समितीचे अध्यक्ष विलास मडिगेरी, सत्तारूढ पक्षनेते एकनाथ पवार, मा. महापौर आर.एस. कुमार, नगरसेवक ॲड. मोरेश्वर शेडगे, केशव घोळवे, सुरेश भोईर, माऊली थोरात, बांबू नायर, मा. नगरसेवक राजाभाऊ दुर्गे, नगरसेविका योगिता नागरगोजे, अनुराधा गोरखे, प्रियांका बारसे, शर्मिला बाबर, वैशाली खाडे यांसोबतच स्वातंत्र्यवीर सावरकर मंडळाचे प्रदिप पाटील, भास्कर रिकामे, संजय मंगोडेकर, योगेश चिंचवडे, नंदू भोगले, अजित कुलथे, कृष्णा भंडलकर, हनुमंत लांडगे, संतोष तापकीर, शितल कुंभार, नंदू कदम, शिवदास हांडे, कैलास सानप, आबा कोळेकर, अदित्य कुलकर्णी, प्रा.दत्तात्रय यादव, द्वारकानाथ कुलकर्णी, वीणा सोनवलकर, कोमल काळभोर, सारिका चव्हाण, प्रतीमा बनसोडे आदी प्रमुख कार्यकर्त्यांनी या आंदोलनात सहभाग घेतला.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button