breaking-newsआंतरराष्टीय
डोनाल्ड ट्रम्प यांचा शिरच्छेद करण्यासाठी 80 मिलियन डॉलरचे बक्षीस?
अमेरिकेने हवाई हल्ला करून इराणच्या मेजर जनरल कासीम सुलेमानी या लष्करी अधिकाऱ्याला ठार केलेले आहे. त्यामुळे या हल्ल्यानंतर इराणने पुन्हा अमेरिकेच्या दुतावासावर हल्ला केला आहे. त्यामुळे इराण आणि अमेरिकेतील तणाव वाढलेला आहे.
इराणने अमेरिकी सैन्य कर्मचारी आणि संपत्तीवर हल्ला केला, तर इराणमधील 52 ठिकाणांना लक्ष्य करण्यात येईल, असा इशारा अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणला दिला आहे. मात्र, यानंतर काही वेळातच इराणने डोनाल्ड ट्रम्प यांचा शिरच्छेद करण्यासाठी 80 मिलियन डॉलर बक्षीस देण्याचे घोषित केल्याचे आंतरराष्ट्रीय मीडियामध्ये प्रकाशित झालेल्या वृत्तावरून समजते आहे.