breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

स्वंयपाक येत नसल्याने विवाहितेचा छळ

पिंपरी – स्वयंपाक येत नसल्याचे कारण करत विवाहितेचा छळ केल्याप्रकरणी पती, सासू, सासऱ्यांसह नणंदेविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विवाहितेने दिलेल्या फिर्यादीनुसार सत्यनारायण गणपती मोटुरु (वय ३४), गणपती मोटुरु (वय ६८), सत्यवती गणपती मोटुरु (वय ५९) व हेमलता राजशेखर (वय ४०) यांच्याविरोधात हिंजवडी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार महिलेला तिच्या पतीने किरकोळ कारणावरुन शिवीगाळ करीत घरातून बाहेर हो, अशी धमकी देऊन घराबाहेर काढले. तसेच तिच्या सासू-सासऱ्यांनी तिला स्वंयपाक येत नाही म्हणून शिवीगाळ केली तर नणंदे राजशेखर यांनी तू माहेरहून कपडे, दागिने व दीड लाख रुपये घेवून ये म्हणून शारीरिक व मानसिक त्रास दिला.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button