breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

पिंपरी-चिंचवडमधील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यांना महापौरांच्या हस्ते पुष्पहार !

पिंपरी | महाईन्यूज | प्रतिनिधी

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त महापालिका प्रशासकीय भवनातील त्यांच्या प्रतीमेस महापौर ऊषा ऊर्फ माई ढोरे, स्थायी समिती सभापती विलास मडिगेरी व आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले.

यापुर्वी दापोडी येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळयासही महापौर ऊषा ऊर्फ माई ढोरे यांनी पुष्पांजली अर्पण केली. यावेळी नगरसदस्या आशा धायगुडे – शेंडगे, माई काटे, सहाय्यक आयुक्त अण्णा बोदडे आदी उपस्थित होते. फुगेवाडी येथील पुतळयास महापौरांच्या पुष्पांजली अर्पण करुन अभिवादन केले. यावेळी नगरसदस्या आशा धायगुडे – शेंडगे, माई काटे, सहाय्यक आयुक्त अण्णा बोदडे आदी उपस्थित होते. कासारवाडी शाळेजवळील पुतळयास त्यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. यावेळी ह प्रभाग अध्यक्ष अंबरनाथ कांबळे, नगरसदस्य शाम लांडे, माऊली थोरात आदी उपस्थित होते.

एच. ए. कॉलनी, पिंपरी येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळयासही पुष्पांजली अर्पण करण्यात आली. यावेळी उपमहापौर तुषार हिंगे, स्थायी समिती सभापती विलास मडिगेरी, ह प्रभाग अध्यक्ष अंबरनाथ कांबळे, नगरसदस्या सुलक्षणा शिलवंत धर, अनुराधा गोरखे, नगरसदस्य माऊली थोरात, माजी नगरसदस्य मोहम्मद पानसरे, जनतासंपर्क अधिकारी रमेश भोसले आदी उपस्थित होते. लांडेवाडी, भोसरी येथील पुतळयासही महापौर ऊषा ऊर्फ माई ढोरे यांच्या हस्ते पुष्पांहार अर्पण करण्यात आला. यावेळी पक्षनेते नामदेव ढाके, स्थायी समिती सभापती विलास मडिगेरी, अनुराधा गोरखे, नगरसदस्य संतोष लोंढे आदी उपस्थित होते.

भोसरी पी. एम. टी. चौकातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुर्णाकृती पुतळयास महापौरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. यावेळी पक्षनेते नामदेव ढाके, स्थायी समिती सभापती विलास मडिगेरी, नगरसदस्या अनुराधा गोरखे, प्रियंका बारसे, नगरसदस्य संतोष लोंढे, क्षेत्रीय अधिकारी श्रीनिवास दांगट, जनतासंपर्क अधिकारी रमेश भोसले आदी उपस्थित होते. त्यानंतर मोशी येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळयासही पुष्पहार अर्पण करण्यात आला. त्यानंतर चिखली येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळयास, मोहननगर चिंचवड येथील पुतळयास, भक्ती–शक्ती, निगडी येथील पुतळयास महापौरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.

थेरगाव येथील महाराजांच्या पुतळयास पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी महापौर ऊषा ऊर्फ माई ढोरे, अपक्ष आघाडीचे गटनेते कैलास बारणे, जनतासंपर्क अधिकारी रमेश भोसले आदी उपस्थित होते. पिंपरी वाघेरे येथील पुतळयासही महापौर यांनी पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले. यावेळी नगरसदस्य संदीप वाघेरे, ज्येष्ठ पत्रकार नंदकुमार सातुर्डेकर, जनतासंपर्क अधिकारी रमेश भोसले आदी उपस्थित होते.

रहाटणी येथील पुतळयासही महापौर ऊषा ऊर्फ माई ढोरे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. यावेळी नगरसदस्या सुनिता तापकीर, सविता खुळे, नगरसदस्य बाबासाहेब त्रिभुवन, शत्रुघ्न काटे, चंद्रकांत नखाते, जनतासंपर्क अधिकारी रमेश भोसले आदी उपस्थित होते.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button