breaking-newsताज्या घडामोडीराष्ट्रिय

CAA विरोधी आंदोलनात पोलिसांवर दगडफेक…एका हेड कॉन्स्टेबलचा मृत्यू…

दिल्ली | महाईन्यूज|

नागरिकत्व सुधारणा कायद्याच्या समर्थनार्थ आणि विरोधावरुन दिल्लीत आज म्हणजे 24 फेब्रुवारीला तणावाची परिस्थिती निर्माण झाली आहे. सीएए विरोधी आंदोलनात आज पुन्हा दगडफेक करण्यात आली असून यामध्ये एका हेड कॉन्स्टेबलचा मृत्यू झाल्याची माहिती मिळत आहे.

भजनपुरा, मौजपूरमध्ये सुरू असलेल्या आंदोलनाला हिंसक वळण लागलं आहे. अनेक जण जखमी झाले आहेत. तसेच परिस्थिती नियंत्रणासाठी अश्रू धुरांच्या नळकांड्या फोडण्यात आल्या आहेत. सीएएच्या समर्थकांनी आणि विरोधकांनी एकमेकांवर दगडफेक सुरू केल्याने तणाव निर्माण झाला आहे. 

रविवारी देखील सीएए विरोधी आंदोलनात दगडफेक झाली होती. सीएएच्या निषेधार्थ जाफराबादमध्ये मोठ्या संख्येने महिला जमा झाल्या होत्या. मात्र कायद्याच्या समर्थनार्थ भाजपा नेते कपिल मिश्रा यांच्या नेतृत्वात मौजपूर चौकाजवळ लोक जमा झाले. त्याचवेळी मौजपूरमधील कबीर नगर मेट्रो स्थानकाजवळ सीएएच्या समर्थक आणि विरोधकांमध्ये दगडफेक झाली. दगडफेकीमुळे संपूर्ण परिसरात तणाव निर्माण झाला होता. 

सीएएच्या समर्थकांनी आणि विरोधकांनी कबीरनगर मेट्रो स्थानकाजवळ एकमेकांवर दगडफेक सुरू केली, त्यामुळे येथील रस्त्यावर लोकांमध्ये धावपळ झाली. या दगडफेकीत एक जण जखमी झाला असून पोलिसांनी त्याला रुग्णालयात दाखल केले होते. दोन्ही बाजूंनी होणारी दगडफेक रोखण्यासाठी पोलिसांनी प्रयत्न केले. लोकांना पांगवण्यासाठी पोलिसांनी अश्रुधुराचे गोळे हवेत उडवले होते… सीएएचे समर्थक आणि विरोधक यांच्यात सुरू असलेल्या संघर्षामुळे दिल्ली मेट्रोने मौजपूर आणि बाबरपूर ही दोनही मेट्रो स्थानके बंद केली आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button