breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

स्थायी समितीकडून खर्चाची ‘डबल सेंच्युरी’

पिंपरी ( महा ई न्यूज ) – महापालिका स्थायी समितीच्या मंगळवारी (दि. २२) झालेल्या दोन बैठकांमध्ये विकासकामांच्या खर्चाची डबल सेंच्युरी झाली. स्थायी समितीने पिंपळे गुरव उद्यान, वेंगसरकर ॲकेडमी, चऱ्होली स्मशानभूमी आणि भीमसृष्टीच्या वाढीव कामांसह विविध सुमारे २०३ कोटी रुपयांच्या विकासकामांना मंजुरी दिली.
ममता गायकवाड स्थायी समिती बैठकीच्या अध्यक्षस्थानी होत्या. तहकूब बैठकीत ३९ कोटी ८० लाख ६३ हजार रुपयांचे ५४ प्रस्ताव मंजूर करण्यात आले. त्यामध्ये थेरगावमधील वेंगसरकर ॲकेडमीच्या उर्वरित कामांसाठी ३ कोटी ८४ लाख, चऱ्होली स्मशानभूमीसाठी ५ कोटी ८३ लाख, पिंपळे गुरव येथील जिजाऊ उद्यानासाठी आणखी ३ कोटी ५५ लाख रुपयांचा खर्च मंजूर करण्यात आला आहे. तर, या आठवड्यातील नियोजित बैठकीत १७३ कोटी ९ लाखांचे एकूण ६८ प्रस्ताव मंजूर करण्यात आले.
त्यात वायसीएम रुग्णालयासाठी २४ कोटी ६० लाखांची साहित्य खरेदी करण्यात आली आहे. मोशीत १८ मीटर डीपी रस्त्यासाठी १२ कोटी, चोविसावाडी येथील १८ मीटर डीपी रस्त्यासाठी २४ कोटी रुपयांचा खर्च मंजूर करण्यात आला आहे. स्थायी समितीने मंगळवारी ऐनवेळी दाखल झालेले ९ कोटी ३४ लाखांचे १२ प्रस्ताव मंजूर करण्यात आले. सुरक्षाविषयक कामासाठी ६ कोटी, पिंपरीतील भीमसृष्टीसाठी आवश्यक कामांसाठी आणखी १ कोटी २४ लाख रुपयांचा खर्च स्थायी समितीने मंजूर केला आहे.
Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button