breaking-newsTOP Newsआंतरराष्टीयताज्या घडामोडीदृष्टीक्षेपदेश-विदेशपश्चिम महाराष्ट्रपिंपरी / चिंचवडमराठवाडामहाराष्ट्रमुंबईराजकारणराष्ट्रिय

दररोद फ्रिज उघडून श्रद्धाचा चेहरा बघायचा ; आफताबच्या डोक्यात नेमकं होतं तरी काय?

नवी दिल्ली । महाईन्यूज । विशेष प्रतिनिधी ।

दिल्लीतील श्रद्धा वालकर हत्याकांडप्रकरणी दिल्ली पोलीस कसून तपास करत आहेत. दिवसेंदिवस याप्रकरणी नवीन माहिती उघड होत आहे. सध्या दिल्ली पोलिसांनी या प्रकरणी आणखी एक धक्कादायक माहिती सार्वजनिक केली आहे. दिल्ली पोलिसांनी सांगितले की, १८ मे रोजी श्रद्धाची गळा आवळून हत्या केल्यानंतर आफताब अमीन पूनावाला हा पुढील १२ तासांत फ्रिज खरेदी करण्यासाठी गेला होता. आरोपीने ३०० लिटरचा फ्रिज विकत घेतला आणि त्याच्या बिलावर श्रद्धाचा मोबाईल नंबर लिहिला होता. त्यावेळी श्रद्धाचा मोबाईल फोन फक्त आफताबजवळच होता. इलेक्ट्रॉनिक शोरूममध्ये काम करणाऱ्या एका कर्मचाऱ्यानेही याला दुजोरा दिला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आफताब पूनावाला याने १८ मेच्या रात्री श्रद्धाची गळा आवळून हत्या केली. यानंतर तो रात्रभर तिच्या मृतदेहासोबत तिच्याच खोलीत राहिला. गुन्हा केल्यानंतर, त्याने बिअर प्यायली, झोमॅटोवरुन जेवण ऑर्डर केले आणि ते खाल्ले. त्यानंतर रात्री उशिरापर्यंत नेटफ्लिक्सवर चित्रपट पाहिला. दुसऱ्या दिवशी सकाळी उठल्यानंतर त्याने श्रद्धाच्या मृतदेहाची विल्हेवाट लावण्याचा विचार केला.

त्यानुसार तो पहिले बाजारात गेला, तेथून त्याने शरीराचे तुकडे करण्यासाठी चाकू आणि इतर शस्त्रं खरेदी केली. त्यानंतर आफताबने फ्रिज विकत घेतला. पोलिसांच्या माहितीनुसार, फ्रिज खरेदी करताना आफताबने बिलावर श्रद्धाचा मोबाईल नंबर लिहिला होता. पोलिसांनी आरोपीच्या घरातून हे बिल जप्त केले आहे.

मृतदेहाचे ३५ तुकडे करुन फ्रिजमध्ये ठेवले
बाजारातून परतल्यानंतर आफताबने जेवण केलं आणि त्यानंतर मृतदेहाची विल्हेवाट लावण्यास सुरुवात केली. यासाठी त्याने पहिल्यांदा श्रद्धाचा मृतदेह खोलीतून ओढून किचनमध्ये आणला. जिथे त्याने मृतदेह कापण्याचा प्रयत्न केला. मात्र, किचनमध्ये जागा कमी असल्याने त्याने मृतदेह पुन्हा ओढून बाथरुममध्ये नेला. जिथे त्याने मृतदेहाचे ३५ तुकडे केले आणि त्यानंतर ते व्यवस्थित धुवून पुसून पॉलिथिनमध्ये गुंडाळले आणि मग ते फ्रिजमध्ये ठेवले.

तीन आठवड्यांनंतर दुर्गंधी येऊ लागल्याने तुकडे जंगलात फेकले

या प्रकरणाचा तपास करत असलेल्या पोलीस अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, आरोपी आफताबने किमान तीन आठवडे श्रद्धाच्या शरीराचे ते ३५ तुकडे फ्रिजमध्ये ठेवले होते. श्रद्धाचा चेहरा पाहण्यासाठी तो दररोज फ्रिज उघडत होता. मात्र, यादरम्यान शरीराचे हे अवयव खराब होऊ लागले. या अवयवातून दुर्गंधी येऊ लागल्यावर आफताबने त्याची विल्हेवाट लावण्याचा विचार केला.

तीन आठवड्यांनंतर आरोपीने श्रद्धाच्या शरीराचे तुकडे एक-एक करून पिशवीत घेऊन जंगलात जाण्यास सुरुवात केली, तिथे तो ते तुकडे फेकायचा जेणेलकरुन कोणी जंगली प्राणी ते खातील. पुढच्या दोन महिन्यांत त्याने त्यांची विल्हेवाट लावली.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button