breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

आईने लग्नास नकार दिल्याने दापोडीत “त्या” चिमुकलीवर अत्याचार करुन खून

पिंपरी ( महा ई न्यूज ) – एका सहा वर्षाच्या चिमुकलीच्या विधवा आईने लग्नास नकार दिल्याच्या कारणावरुन एका तरुणाने त्या चिमुकलीवर अनैसर्गिक कृत्यू करुन तिचा खून केला. त्यानंतर स्वत:ही गळफास घेऊन आत्महत्या केली. ही धक्कादायक घटना आज (मंगळवार) सकाळच्या सुमारास दापोडी सीएमई परिसरात घडली.

आरुशी (वय ६, रा. दापोडी) असे अत्याचार करुन खून करण्यात आलेल्या चिमुकलीचे नाव आहे. तर विजय यादव (वय २२) असे आरोपी तरुणाचे नाव असून त्याने देखील गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. याप्रकरणी मृत चिमुकलीच्या आईने भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

मृत मुलीची आई सीएमईमध्ये सफाई कर्मचारी आहे. तर आरोपी विजय यादव त्याच कॉलेजच्या कॅन्टीनमध्येच वेटरच काम करत होता. सहा महिन्यांपूर्वी मृत मुलीच्या वडिलांचे गंभीर आजाराने निधन झाले. ते ड्रायव्हर होते. त्यांच्या निधनांतर मुलीच्या आईचे आणि विजयमध्ये प्रेमसंबंध निर्माण झाले. काही लोकांनी त्यांना एकत्र पाहिलेही होते. लग्नासाठी तो महिलेच्या मागे लागला होता. पण वयात मोठे अंतर असल्याने त्या महिलेने त्याला लग्नास नकार दिला होता. त्यावरून सोमवारी त्या दोघांमध्ये मोठा वाद झाला होता.

आज सकाळी महिलेची सहा वर्षांची मुलगी आरुशी ही घरी एकटीच होती. तिची आई कामाला गेली होती तर मोठी बहिण शाळेत गेली होती. यावर आरोपीने घरात घुसून सहा वर्षांच्या चिमुकलीवर अनैसर्गिक कृत्यू करुन खून केला. पोलीसांच्या चौकशी दरम्यान संशयीत विजय याचे नाव समोर आले. पोलिसांनी तपासाला सुरुवात केली असता विजयचा मृतदेह सीएमईच्या जंगलात तारेच्या सहायाने गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आला. पोलीस निरीक्षक नरेंद्र जाधव तपास करत आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button