breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

‘स्थायी’चे धोरण भाजपने मोडले, म्हणून बंडखोरीने फाॅर्म भरला – शितल शिंदे

स्थायी सभापती निवडणूक, बंडखोर उमेदवार शितल शिंदेना राष्ट्रवादी-शिवसेनेचा मदतीचा हात  

पिंपरी ( महा ई न्यूज ) – महानगरपालिकेच्या स्थायी समिती सभापती पदासाठी भाजपच्या  वरिष्ठ पातळीवरुन माझ्या नावाची शिफारस करण्यात आली. मात्र, उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या दहा मिनिटापुर्वी माझा पत्ता कट केेला. त्यामुळे स्थायी समितीत भाजपच्या स्थानिक नेत्यांनी ठरविलेले धोरण मोडले आहे. त्यानी माझ्यावर अन्याय केलाय, म्हणून विरोधकांची मदत घेवून फॅार्म भरला आहे, अशी माहिती नगरसेवक शितल ऊर्फ विजय शिंदे यांनी पत्रकार परिषदेत दिली. 

यावेळी विरोधी पक्षनेते दत्ता साने, शिवसेना गटनेते राहूल कलाटे, उपमहापाैर सचिन चिंचवडे, नगरसेवक राजू मिसाळ, पंकज भालेकर, तुषार कामठे, मयुर कलाटे, नवनाथ जगताप, प्रज्ञा खानोलकर, गिती मंचरकर, प्रशांत शितोळे यांच्यासह आदीजण उपस्थित होते.

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक 19 मधील भारतीय जनता पार्टीचे नगरसेवक शितल ऊर्फ विजय शिंदे यांनी बंडखोरी करुन स्थायी समिती सभापती पदासाठी उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यांना अर्ज दाखल करण्यास राष्ट्रवादी काॅंग्रेस आणि शिवसेनेने मदत केली. दरम्यान, स्थायी समिती सभापती पदासाठी पक्षाच्या वरिष्ठ पातळीवरुन माझ्या नावाची शिफारस करण्यात आली. मात्र, ऐनवेळी स्थानिक पातळीवर माझ्या नाव वगळून विलास मडिगेरी संधी देण्यात आली. त्यामुळे विरोधकांची मदतीने मी उमेदवारी दाखल केलीय. पक्षाने स्थायीचे ठरविलेले धाेरण गुंडाळून ठेवले आहे. भाजपचे 40 टक्के नगरसेवक माझ्यासोबत आहेत. मी पक्षाचा जूना निष्ठावंत कार्यकर्ता असून दुस-यांना नगरसेवक पदाची टर्म आहे. एवढा प्रबळ दावेदार असतानाही मला डावललं आहे.

तसेच विलास मडिगेरी हे पहिल्यांदा नगरसेवक असून त्यांनी स्थायीत सदस्य म्हणून पद उपभोगले आहे. पक्षाने सर्वांना संधी म्हणून एक वर्षांसाठी स्थायी सदस्य पद ठेवले होते. त्यांना पुन्हा संधी असेल तर मी पाठीमागच्या वेळेला स्थायीत थांबलो असतो. हे धोरण मोडल्यामुळे ही उमेदवारी दाखल केली आहे, असेही शिंदे यांनी सांगितले.

दरम्यान,  विरोधी पक्षनेते दत्ता साने म्हणाले की, राष्ट्रवादी काॅंग्रेसकडून नगरसेवक मयुर कलाटे यांनी स्थायी समिती सभापती पदासाठी उमेदवारी दाखल केली. परंतू, नगरसेवक शितल शिंदे यांनी मदत मागितल्याने त्यांच्या उमेदवारीसाठी सुचक आणि अनुमोदक म्हणून राष्ट्रवादी व शिवसेनेच्या नगरसेवकांनी सही केलेली आहे. त्यामुळे स्थायी सभापती पदासाठी दोघापैकी एकाचा अर्ज ठेवून सभापती पद आमचा उमेदवार निवडून येईल, असा विश्वास साने यांनी व्यक्त केला. 

 

 

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button