breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीपुणेमहाराष्ट्रराजकारण

नऱ्हे ग्रामस्थांचा मूलभूत सुविधांसाठी रास्ता रोको

  • राष्ट्रवादीचे भूपेंद्र मोरे यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन : सुमारे ३०० महिला सहभागी

पुणे | प्रतिनीधी 

पुणे महानगरपालिकेमध्ये समाविष्ट झालेले नऱ्हे गाव गेल्या सहा महिन्यापासून मूलभूत सुविधांसाठी लढा देत आहे. आतापर्यंत १०५ निवेदने आणि अनेक आंदोलने करून देखील प्रशासनाने दखल याची घेतली नाही. त्यापार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे सरचिटणीस भूपेंद्र मोरे यांच्या नेतृत्वाखाली नऱ्हे ग्रामस्थांनी धायरी फाटा ते वडगाव पुलापर्यंत प्रतिमात्मक बैलगाडी आणि हंडा मोर्चा काढत वडगाव पुलाखाली रास्ता रोको आंदोलन करताना पुणे मनपाचा निषेध नोंदवला.

पालिकेमध्ये समाविष्ट झालेल्या गावांकडून जवळपास ३४ कोटी मालमत्ता कर पालिकेकडे जमा झालेला असताना देखील सहा महिन्यांमध्ये समस्त गावात पालिकेला मूलभूत सुविधा पुरवण्यात अपयश आहे. सध्या दिवसेंदिवस कचरा आणि नाले प्रश्न तीव्र होताना दिसत आहे. गेल्या कित्येक महिन्यांपासून महापालिकेला नऱ्हे येथील कचरा आणि तुंबलेली नाले याचा प्रश्न सोडवता आला नाही, त्यामुळे जागोजागी कचऱ्याचे साम्राज्य पसरले असून रोगराई पसरण्याची भीती व्यक्त केली जात आहे. या असे असताना देखील कचरा संकलनासाठी नागरिकांना आता प्रत्येक घराला ७५ रुपये मोजावे लागत आहेत. त्यामुळे नागरिकांवर आर्थिक भुर्दंड देखील बसत आहे. त्याचबरोबर रस्त्याच्या दुतर्फा पथ दिव्यांचा अभाव आणि खड्डेमय रस्ते रस्त्यांमुळे अपघातात वाढ झालेली दिसून येत आहे. तरी पालिकेने वरील सर्व प्रलंबित प्रश्न तात्काळ मार्गी लावावेत अशी मागणी यावेळी भूपेंद्र मोरे यांच्याकडून करण्यात आली.

यावेळी पालिकेच्या पाणीपुरवठा विभागाचे कनिष्ठ अभियंता व्यंकटेश पाटील यांनी विविध मागण्यांचे निवेदन स्वीकारले, व मागण्या मार्गी लावण्याचे आश्वासन दिले. यानंतर रास्ता रोको आंदोलन स्थगित करण्यात आले.

  • आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर एका दिवसात साफसफाई

गेल्या कित्येक दिवसापासून नरे परिसरामध्ये कचऱ्याचे साम्राज्य साठले होते. आंदोलन करणार असल्याच्या पार्श्वभूमीवर पालिकेने जेसीबी आणि डंपर च्या साह्याने दिवसभरात नऱ्हे गावात कचरा साफ सफाईचे काम जोरदार सुरू होते. त्यामुळे याची चर्चा नऱ्हे गावात पाहायला मिळाली.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button