breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

भाजपाचे शितल शिंदे यांची ‘बंडखोरी’, राष्ट्रवादीच्या पाठिंब्यावर लढणार

पिंपरी, (महा-ई-न्यूज) – गेल्या काही दिवसांपासून स्थायी समिती सभापती पदासाठी विजय उर्फ शितल शिंदे यांच्या नावाची चर्चा असताना ऐनवेळी विलास मडिगेरी यांचा भाजपतर्फे अर्ज दाखल झाला आहे. त्यामुळे शितल शिंदे यांनी भाजपवर नाराजी व्यक्त केली आहे. राष्ट्रवादीचे विरोधी पक्षनेते दत्ता साने यांच्या कार्यालयात त्यांनी पत्रकार परिषद घेऊन पक्षाच्या विरोधात जाण्याची तयारी ठेवली आहे.

पक्षाच्या विरोधात बंडखोरी करून त्यांनी अर्ज भरल्याने सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत. मी दोन वेळा निवडून आलो आहे. पक्षाचा प्रबळ दावेदार आहे. पक्षातल्या 40 टक्के नगरसेवकांचे मला समर्थन आहे. असे असताना ऐनवेळी विलास मडिगेरी यांचा अर्ज भरण्याची खेळी पक्षश्रेष्ठींनी केली आहे. मडिगेरी हे एकवेळा पालिका निवडणुकीत निवडून आले आहेत. स्थायी समिती सदस्य पद एक वर्षासाठी त्यांना दिलेले असताना पुन्हा यावर्षी त्यांचे सदस्यत्व कायम ठेवून त्यांचा सभापती पदासाठी अर्ज भरण्याचे कारण काय आहे, असा प्रश्न शिंदे यांनी उपस्थित केला आहे. त्यामुळे बंडखोर गटाचा उमेदवार म्हणून मी राष्ट्रवादीचा पाठिंबा घेऊन स्थायी समितीच्या सभापती पदाची निवडणूक लढणार आहे.

राष्ट्रवादी, शिवसेना, अपक्ष गटाचा पाठिंबा मला मिळेल यावर माझा विश्वास आहे, असेही शिंदे यांनी म्हटले आहे.  शिंदे यांनी पक्षाच्या विरोधात जाऊन राष्ट्रवादीच्या कार्यालयात पत्रकार परिषद घेऊन मनातली खदखद व्यक्त केली आहे. राष्ट्रवादीचे उमेदवार मयूर कलाटे यांनी अर्ज मागे घेतल्यास शिंदे यांची लढत सोपी होणार आहे. त्यासाठी राष्ट्रवादीने तयारी देखील दाखविला आहे. स्थायी समितीवर सभापती पदाचा मान आम्हालाच मिळणार यावर विरोधी पक्षनेते दत्ता साने यांनी देखील विश्वास व्यक्त केला आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button