breaking-newsपुणेमहाराष्ट्र

स्टेट बँकेच्या एटीएम वर दरोडा टाकण्यासाठी आलेल्या टोळीस अटक

बिबवेवाडीमधील स्टेट बँकेच्या एटीएमवर दरोडा टाकण्यासाठी आलेल्या टोळीस पोलिसांनी अटक केली असून  25 हजारांची हत्यारे जप्त करण्यात आली आहेत.ही घटना आज सोमवारी(दि. 10) पहाटे साडेतीन च्या सुमारास पद्मा सहकारी सोसायटी शेजारी,बिबवेवाडी येथे घडलीे

रोहित चंद्रकांत जानराव(वय 19, रा. बिबवेवाडी) व अविनाश अर्जुन जोगन (वय 22) व इतर चार साथीदारांना अटक करण्यात आलेली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अटक केलेल्या टोळीनी संगनमत करून जीवितास हानी असलेल्या अवैध वस्तू जवळ बाळगल्या.  तब्बल 25 हजार रुपयांचा ऐवज जवळ ठेऊन स्टेट बँकेच्या एटीएम सेंटर वर दरोडा टाकण्यासाठी आलेल्या टोळीला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

याप्रकरणी पुढील तपास बिबवेवाडी पोलीस करत आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button