breaking-newsTOP NewsUncategorizedताज्या घडामोडीमहाराष्ट्र

धनंजय मुंडेंवरील बलात्काराच्या आरोपावर भाजप आक्रमक, केली ‘ही’ मागणी

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे यांच्यावर बलात्काराचा आरोप झाल्यानंतर विरोधी पक्षाने त्यांच्यावर निशाणा साधला आहे. मुंडे यांनी आपल्यावरील सर्व आरोप फेटाळले असले, तरीही आरोप करणाऱ्या महिलेच्या बहिणीसोबत परस्पर सहमतीने संबंधात होतो, असा खुलासा त्यांनी केला आहे.

आता भाजपने यावरून आक्रमक भूमिका घेतली असून, भाजप महिला मोर्चाच्या प्रदेशाध्यक्षा उमा खापरे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहित राजीनाम्याची मागणी केली आहे.

सामाजिक न्याय खात्यासारख्या अतिमहत्त्वाच्या असणाऱ्या कॅबिनेट मंत्रिपदाची जबाबदारी आपण गंभीर आरोप असलेल्या बेजबाबदार व्यक्तीवर टाकलेली आहे. वरील घटनेमुळे निश्चितच समाजावर त्याचा विपरित परिणाम होणार आहे. वस्तुस्थितीचे गांभीर्य ओळखून आपण कॅबिनेट मंत्री धनंजय मुंडे यांचा त्वरित राजीनामा घ्यावा, अशी मागणी खापरे यांनी केली आहे.

राजीनामा न घेतल्यास भाजपा महिला मोर्चा आपल्या सरकारविरुद्ध सदर मंत्र्याच्या राजीनाम्यासाठी व कायदेशीर कारवाईसाठी तीव्र आंदोलन छेडेल, असा इशारा देखील त्यांनी मुख्यमंत्र्यांना दिला आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button