breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्र

बोगस देणगी पावत्या काढून वारकऱ्यांना लाखोंचा गंडा, प्रकरण दडपण्याचा प्रयत्न

पंढरपूर –  आषाढीवारीच्या घाईगर्दीत देणगीच्या बोगस पावत्या देऊन हजारो भाविकांना लाखो रुपयांचा गंडा घातला गेला असल्याची धक्कादायक आणि संतापजनक घटना भाविकांच्या सतर्कतेमुळे उघडीस आली आहे. खोट्या पावत्या देऊन गोरगरीब वारकऱ्यांची फसवणूक करणाऱ्या श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीच्या सिद्धेश्वर घायाळ या भामट्या कर्मचाऱ्यावर मंदिर व्यवस्थापनाने निलंबनाची कारवाई आली आहे. ही घटना 9 जुलैची आहे.

दीपेश रामजी भंडारी( रा.गंगाखेड, जि. परभणी) हे भाविक श्री विठ्ठलाच्या पदस्पर्श रांगेत उभे होते. मंदिराच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ सिद्धेश्वर घायाळ हा कर्मचारी टेबल टाकून भाविकांना देणगी पावती फाडण्यासाठी विनंती करीत होता. भंडारी यांनी 1100 रुपये देऊन देणगी पावती घेतली. दर्शन रांगेतून काही अंतर चालत गेल्यानंतर त्यांना पुन्हा एक देणगी टेबल दिसले आणि त्या टेबलावरील पावती पुस्तकाचा रंग आणि आपण फाडलेल्या पावतीचा रंग वेगळा असल्याचे त्यांच्या लक्षात आले. उत्सुकता म्हणून त्यांनी दर्शन झाल्यानंतर मंदिर समितीचे कार्यालय गाठले आणि शहानिशा करण्याचा प्रयत्न केला असता त्यांना समाधानकारक उत्तरे मिळाली नाहीत. म्हणून भंडारी यांनी सदरची बाब मंदिराच्या बंदोबस्ताला असलेले पोलीस नाईक वामन यलमार यांच्या निदर्शनास आणून दिली. तक्रारीची शहानिशा करण्यासाठी पोलिसांनी ज्याठिकाणी पावती फाडली त्या ठिकाणी तक्रारदार भाविकाला घेऊन भेट दिली मात्र कर्मचारी गायब झालेला होता. मात्र त्याठिकाणी दोन बोगस पावती पुस्तके आढळून आली ती यलमार यांनी ताब्यात घेतली.

पुराव्यासह प्रकरण पुढे आल्यानंतर देखील ‘अगा असे घडलेची नाही’ अशी भूमिका नेहमीप्रमाणे कारभाऱ्यांनी घेतली. वारीची गडबड त्यात देणगी पावतीचा घोटाळा समोर आला तर मंदिराची बदनामी होईल मुख्यमंत्री दोन दिवसांनी महापूजेला येत आहेत त्यांच्या समोर तोंड दाखवायला जागा राहणार नाही या भीतीपोटी मंदिराच्या मुख्य कारभाऱ्यांनी हे प्रकरण पुरेपूर दडपण्याचा प्रयन्त केला. शेवटी कारभाऱ्याच्या नियोजनाप्रमाणे वारी पडली आणि पुन्हा या विषयाला वाचा फुटली काल पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज तपासले असताना सिद्धेश्वर घायाळ हा कर्मचारी टेबल टाकून देणगी पावत्या फाडत असल्याचे निदर्शनास आले. ही बाब समोर येऊन दोन दिवस झालेत तरी देखील घायाळ याच्यावर गुन्हा दाखल केलेला नाही. गेल्या चार दिवसांत मंदिराकडे देणगी पावतीच्या आधारे 25 लाख रुपये जमा झाले असल्याची माहिती मंदिर व्यवस्थानकडून देण्यात आली आहे. आता घोटाळ्याची पुस्तके आणि रक्कम किती असेल याचा तपास करणे पोलिसांसमोर आव्हान आहे

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button