breaking-newsराष्ट्रिय

स्टरलाईट गोळीबाराच्या त्वरित सुनावणीस सर्वोच्च न्यायालयाचा नकार

नवी दिल्ली – तामिळनाडूमधील तूतुकोडी येथील स्टरलाईट गोळीबार प्रकरणाच्या त्वरित सुनावणीस सर्वोच्च न्यायालयाने नकार दिला आहे. स्टरलाईट आंदोलना दरम्यान पोलीसांनी केलेल्या गोळीबारात 13 जण मरण पावले होते. स्टरलाईट गोळीबार प्रकरणाच्या त्वरित सुनावणीसाठी मृतांच्या नातेवाईकांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. मात्र सर्वोच्च न्यायालयाने सोमवारी सुनावणीस नकार दिला असून पुढील तारीखही दिलेली नाही. उन्हाळी सुटीनंतरच या प्रकरणाची सुनावणी करण्यात येणार असल्याचे सर्वोच्च न्यायालयाने सांगितले आहे.

22-23 मे रोजी स्टरलाईट प्रकल्पाच्या विरोधात आंदोलन झाले होते त्यावेळी झालेल्या हिंसाचारात 13 जण ठार झाले होते, तर शेकडो जखमी झाले होते. तामिळनाडू सरकारने स्टरलाईट प्रकल्प बंद करण्याचा आदेश दिला आहे. स्टरलाईट प्रकल्प कायमस्वरूपी बंद करण्यात यावा असे राज्य प्रदूषण मंडळाने म्हटले आहे. स्टरलाईट प्रकल्प हा भारतातील दुसऱ्या क्रमांकाचा सर्वात मोठा कॉपर प्लांट आहे. त्याची उत्पादनक्षमता वर्षाला 400000 टन इतकी आहे.

या प्रकल्पामुळे मोठ्या प्रमाणावर प्रदूषण होत असल्याचा आणि त्यामुळे आरोग्यावर दुष्परिणाम होत असल्याचा नागरिकांचा आरोप आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button