breaking-newsराष्ट्रिय

लखनौमधील एका घरात स्फोट – दोन ठार

खनौ (उत्तर प्रदेश) – लखनौमधील एका घरात आज झालेल्या स्फोटात दोन जण ठार झाल्याची माहिती पोलीसांनी दिली आहे. लखनौच्या सीमेवरील काकोरी भागात हा स्फोट झाला आहे. सकाळी अकराच्या सुमारास नासीर नावाच्या व्यक्तीच्या घरात झालेल्या या स्फोटामुळे ते घर कोसळले असून आजूबाजूच्या काही घरांची पड्‌झड झाल्याची महिती लखनौ (ग्रामीण) अधीक्षक गौरव ग्रोव्हर यांनी दिली आहे.

या स्फोटात मरण पावलेल्या दोघांपैकी एकाची रामशरम (40) अशी ओळख पटली आहे. मरण पावलेल्या दुसऱ्या महिलेच्या देहाच्या चिंधड्या झाल्याने तिचे ओळख पटू शकली नाही.

फोरेन्सिक टीक स्फोटाच्या कारणांचा तपास करत आहे. मात्र प्रथमदर्शनी घराच्या तळघरात साठा करून ठेवलेल्या काही स्फोटकांमुळे हा धमाका झाला असावा असे मत पोलीसांनी व्यक्त केले आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button