breaking-newsमनोरंजन

स्क्रिप्टमध्ये नसतानाही अमला पॉलने रम्यासोबत दिला ‘लिपलॉक’ सीन

दाक्षिणात्य चित्रपटांमध्ये दमदार भूमिकांसाठी ओळखली जाणारी अभिनेत्री अमला पॉल सध्या तिच्या ‘आदाई’ या चित्रपटामुळे फार चर्चेत आहे. एकीकडे या चित्रपटातील न्यूड सीनवरून वाद सुरू असताना आता अमलाने आणखी एक खुलासा केला आहे. या चित्रपटातील स्क्रीप्टमध्ये नसतानाही तिने सहकलाकार रम्या सुब्रहमण्यमला किस केल्याचं तिने सांगितलं आहे. ‘आदाई’च्या ट्रेलरमधील अमला व रम्याचा लीपलॉक सीन चांगलाच चर्चेत आला होता. हा सीन स्क्रिप्टेड नसल्याचं अमलाने सांगितलं आहे.

या दृश्याविषयी जेव्हा तिने आईला सांगितलं तेव्हा त्यांची प्रतिक्रिया काय होती हेसुद्धा तिने सांगितलं. ‘मी अम्माला चित्रपटाची स्क्रिप्ट सांगितली आणि तिला धक्काच बसला. पण ती पुढे म्हणाली की जर कथेची गरज असेल तर विचार कर आणि ऑफर स्वीकार,’ असं अमलाने सांगितलं.

या दृश्याविषयी ती पुढे म्हणाली, ‘चित्रपटातील कामिनी या भूमिकेचा स्वभाव चंचल, स्वार्थी असा आहे. सुरुवातीला माझाही स्वभाव तसाच होता पण आता मी तशी नाही. किसिंग सीनला बऱ्याच लोकांनी ट्रोल केलं आहे. तो सीन स्क्रिप्टमध्ये नव्हता पण एकदा का तुम्ही भूमिकेत शिरलात की मग तुमच्या आतील अभिनेत्याला तुमच्यावर नियंत्रण मिळवू द्यावं. मुलींनी एकमेकांना किस करण्यात गैर काय आहे?,’ असा सवाल तिने उपस्थित केला.

तो किसिंग सीन का आहे हे समजून घेण्यासाठी चित्रपट पाहणं गरजेचं असल्याचंही ती सांगते.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button