breaking-newsमनोरंजन

सलमान खान सांगतोय गर्लफ्रेंड विषयी, पाहा व्हिडीओ

अभिनेता अमेय वाघ आणि अभिनेत्री सई ताम्हणकर मुख्य भूमिकेत असलेला बहुचर्चित ‘गर्लफ्रेंड’ हा चित्रपट २६ जुलै रोजी प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटाला प्रेक्षकांनी अक्षरश: डोक्यावर उचलून धरला आहे. त्यातच बॉलिवूडचा दबंग खान सलमानने ‘गर्लफ्रेंड’ चित्रपटाला शुभेच्छा देत व्हिडीओ शेअर केला आहे.

अमेय वाघने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर नुकताच एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये सलमान ‘गर्लफ्रेंड, गर्लफ्रेंड, गर्लफ्रेंड.. साजिद नाडीयाडवाला म्हणजेच माझा भाऊ त्याची बहिण अफिफा. अफिफाने एक मराठी चित्रपट आणला आहे. या चित्रपटाचे नाव आहे गर्लफ्रेंड. तुम्ही काय विचार करताय? जा आणि हा चित्रपट पाहा’ असे सलमान व्हिडीओमध्ये बोलताना दिसत आहे.

गर्लफ्रेंड या चित्रपटाद्वारे अमेय वाघ आणि सई ताम्हणकर ही जोडी प्रथमच प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. या चित्रपटातील अमेय आणि सई यांच्यातील ऑन स्क्रिन केमेस्ट्री पाहण्यासारखी आहे. ‘गर्लफ्रेंड’ या चित्रपटाच्या दिग्दर्शनाची जबाबदारी उपेंद्र सिंधये यांच्यावर होती. उपेंद्र यांनीच या चित्रपटाचे लेखनही केले आहे. तर चित्रपटाची निर्मिती अनिश जोग, रणजित गुगळे, अमेय पाटीस, कौस्तुभ धामणे, अफीफा सुलेमान नाडियादवालाने केले आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button