breaking-newsव्यापार

सोन्याचा दर ५४ हजार ५३८ रूपये प्रति १० ग्रामवर पोहोचला

नवी दिल्ली – सोन्याच्या दरानं सध्या उच्चांक गाठला असून सराफा बाजारात शुक्रवारी सोनाच्या किंमतीत ६८७ रूपयांची वाढ होऊन सोन्याचा दर ५४ हजार ५३८ रूपये प्रति १० ग्राम वर पोहोचला. एचडीएफसी सिक्योरिटीजनं यासंदर्भातील माहिती दिली आहे. यापूर्वी गुरूवारी कामगाजाच्या अखेरिस सोन्याचा दर ५३ हजार ८५१ रूपये प्रति १० ग्रामवर पोहोचला होता. तर दुसरीकडे शुक्रवारी चांदीच्या किंमतीतही मोठी वाढ पाहायला मिळाली. चांदीच्या किंमतीत २ हजार ८५४ रूपयांची वाढ होऊन ती ६५ हजार ९१० रुपये प्रति किलोवर पोहोचली. गुरूवारी चांदीचा दर ६३ हजार ०५६ रूपये प्रति किलो इतके होते. गेल्या अनेक दिवसांपासून सोन्याचांदीच्या दरात वाढ होत आहे.

आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत सोन्याचांदीच्या किंमतीमध्ये वाढ झाल्यानंतर दिल्लीतील २४ कॅरेट सोन्याच्या किंमतीत ६८७ रूपयांची वाढ झाली, अशी माहिती एचडीएफसी सिक्युरिटीजचे वरिष्ठ विश्लेषक (कमोडिटीज) तपन पटेल यांनी दिली. तर दुसरीकडे शुक्रवारी शेअर बाजाराच्या निर्देशांकातही घसरण पाहायला मिळाली. तर अमेरिकन डॉलरच्या तुलनेत रुपयची चार पैशांनी घसरण होऊन एका डॉलरची किंमत ७४.८४ रुपयांवर (प्राथमिक आकडेवारी) बंद झाली.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button