breaking-newsताज्या घडामोडीराष्ट्रिय

८८व्या वर्धापन दिनानिमित्त भारतीय हवाई दलाच्या चित्तथरारक कसरती

गाझियाबाद – ८८ वर्षांपूर्वी ८ ऑक्टोबर १९३२ रोजी भारतीय हवाई दलाची स्थापना करण्यात आली होती. त्यामुळे आज भारतीय हवाई दलाचा 88वा वर्धापन दिवस आहे. यानिमित्ताने गाझियाबादमधील हिंडन एअरबेसवर हवाई दलाची ताकद पाहायला मिळाली. याठिकाणी आयोजित करण्यात आलेल्या विशेष कार्यक्रमात हवाई दलाच्या पथकाने आकाशात चित्तथरारक अशा कसरती करून दाखवल्या.

आज देशात हवाई दलाची एकूण ६० एअरबेस आहेत. तर एकूण १७०० लढाऊ विमाने आणि हेलिकॉप्टर्स हवाई दलाच्या ताफ्यात आहेत. यात ५०० हून अधिक विमाने ही मालवाहू आहेत. याशिवाय वेगवेगळ्या प्रकारची हेलिकॉप्टर्सही भारताच्या हवाई दलात आहेत.

आजच्या कार्यक्रमात हवाई दल प्रमुख राकेश भदौरिया म्हणाले की, ‘आपण ८९व्या वर्षात पदार्पण करत असून हवाई दलात परिवर्तन सुरू आहे. आपण अशा एका युगात प्रवेश करत आहोत जिथे आपण एअरोस्पेस पॉव्हर नियोजित करणार आहोत.’ तसेच मल्टी डोमेन ऑपरेशनही करणार असल्याचे राकेश भदौरिया यांनी सांगितले. तर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी हवाई दलाचे कौतुक करताना म्हटले, ‘पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्त्वाखाली केंद्र सरकार आपल्या पराक्रमी जवानांचा दरारा कायम ठेवण्यासाठी प्रयत्न करत आहे. हवाई दलाच्या वर्धापन दिनानिमित्त शुभेच्छा.’

दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही ट्विटरच्या माध्यामातून हवाई दलाच्या जवानांचे अभिनंदन केले आहे. ‘हवाई दलाच्या दिनानिमित्त भारतीय हवाई दलाच्या सर्व शूर योद्ध्यांना शुभेच्छा! आपण फक्त देशाचे अवकाश सुरक्षित ठेवत नाही तर आपत्तीच्यावेळी मानवतेच्या सेवेतही अग्रेसर भूमिका बजावत असता. भारत मातेच्या रक्षणासाठी आपले धैर्य, पराक्रम आणि समर्पण सर्वांनाच प्रेरणा देणार आहे’, असे ट्विट नरेंद्र मोदींनी केले आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button