breaking-newsराष्ट्रिय

सैनिकाने मुलांसमोरच पत्नी आणि मेव्हणीची गोळी झाडून केली हत्या

लष्करी सेवेत असलेल्या जवानाने धावत्या गाडीत मुलांसमोरच पत्नी आणि मेव्हणीची गोळी झाडून हत्या केली. नंतर स्वत:ला संपवले. पाटण्याच्या सायदाबाद भागात रविवारी ही धक्कादायक घटना घडली. विष्णू कुमार शर्मा (३३) असे मृत जवानाचे नाव असून तो गुजरातमध्ये तैनात होता. अलीकडे सुट्टीवर तो घरी आला होता.विष्णूने पत्नी दामिनी आणि तिची बहिण डिम्पल शर्माची गोळी झाडून हत्या केली. पालीगंजचे पोलीस उपधीक्षक मनोज कुमार पांडे यांनी ही माहिती दिली.

गाडीमध्ये विष्णूसोबत त्याची मुले सुद्धा होती. मुले आजोबांसोबत पुढच्या सीटवर बसल्याने बचावली. घटनास्थळावरुन पोलिसांनी बंदूक, विष्णूचे ओळखपत्र आणि कार ताब्यात घेतली आहे. हत्येसाठी जी बंदूक वापरली त्याचा परवाना होता. वडिलांनी आधी मावशीवर गोळी झाडली त्यानंतर आई आणि स्वत:वर गोळी झाडून घेतली. आजोबा कसेबसे गाडीतून उतरले व त्यांनी स्थानिकांची मदत घेतली असे विष्णूच्या मोठया मुलाने सांगितले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button