breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

दापोडी दुर्घटना, ठेकेदारासह पालिका अधिका-यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल

पोलिसांकडून तिघांना घेतले ताब्यात, अग्नीशमन जवानांसह दोघाचा मृत्यू

पिंपरी |महाईन्यूज|प्रतिनिधी

महापालिकेने अमृत योजनेंतर्गत ड्रेनेज लाईनसाठी खोदण्यात आलेल्या खड्ड्यात मातीच्या ढिगा-याखाली मजुर गाडले गेला होता. त्याला वाचवण्यास गेलेल्या अग्नीशमन जवानही गाडले गेला. त्या अथक परिश्रमाने बचाव कार्यात दोघांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले. परंतू, कंत्राटदार, सहकंत्राटदार, दोन सुपरवायझर आणि पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या संबंधित विभागाच्या अधिकार्‍यांवर या प्रकरणी सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे तर तिघांना ताब्यात घेण्यात आले आहे.

पाटील कन्स्ट्रक्शन व इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेडचे मालक एम.बी. पाटील, सब ठेकेदार अशोक माणिकराव पिल्ले, सुनिल रमेश शिंदे, सुपरवायझर धनंजय सुधारक सगट यांच्यासह पिंपरी चिंचवड महापालिकेचे संबंधित अधिका-यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याप्रकरणी कल्याणी पिरप्पा जमादार (वय 56, ओमकार वस्ती फुगेवाडी, मुळ कर्नाटक), यांनी भोसरी पोलिस ठाण्यात फिर्याद यांनी दिली. नागेश कल्याणी जमादार (वय 22) असे मृत्यू झालेल्या कामगाराचे नाव आहे.  

अमृत योजनेंतर्गत ड्रेनेज लाईनसाठी खोदण्यात आलेल्या खड्ड्यात गाडले गेलेल्या मजुराचा मृतदेह नऊ तासांच्या बचाव कार्यानंतर बाहेर काढण्यात एन डी आर एफ जवानांना यश आले. तर अग्निशमन दलाचा जवानाचा मृतदेह त्याच्या सहकाऱ्यांनी अडीच तासानंतर शोधून बाहेर काढला होता. दापोडी येथे रविवारी (१ डिसेंबर) सायंकाळी सात वाजल्यापासून हे बचाव कार्य सुरू करण्यात आले होते पहाटे चार वाजेपर्यंत हे बचाव कार्य चालले.

जवान विशाल जाधव आणि मजूर नागराज जमादार असे या घटनेत मृत्यू झालेल्या दोघांची नावे आहेत. खड्ड्यांमध्ये जमादार पडल्यानंतर त्याला वाचवण्यासाठी इतर दोन युवक या खेड्यात उतरले होते मात्र बघ्यांची गर्दी होऊन मातीचा ढिगारा या तिघांच्या अंगावर कोसळला त्यामुळे तिथे गाडले गेले होते. याची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे चार जवान असलेली एक गाडी घटनास्थळी दाखल झाली होती. या जवानांनी मदत कार्य राबवताना पुन्हा मातीचा ढिगारा जवानांच्या अंगावर कोसळला होता.

या सर्व विचित्र प्रकारात तीन जवान, मजूर जमादार या दोघांसह अन्य दोन युवक अडकले होते. त्यापैकी दोन युवक आणि दोन जणांना सुखरूप बाहेर काढण्यात आले. परंतु जवान जाधव आणि मजूर जमादार या दोघांचा या घटनेत मृत्यू झाला; अग्निशमन दलाच्या जवानांसह एनडिआरएफ व लष्कराच्या जवानांनी अथक प्रयत्न करून नऊ तास हे बचाव कार्य सुरू ठेवले होते.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button