breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

मराठा आरक्षणाची जबाबदारी केंद्र सरकारचीच – दिगंबर डुबल

पिंपरी – मराठा आरक्षणाची जबाबदारी केंद्र सरकारची असून घटना दुरुस्ती करून केंद्र सरकारने आरक्षणाची मर्यादा वाढवून दयावी अशी मागणी दिगंबर डुबल यांनी केली आहे.तर मराठा सेवा संघाने अंधश्रद्धा व कर्मकांडात अडकलेल्या समाजाला नवीन दिशा दयावी असे म्हणत मराठा सेवा संघाच्या शाखा देशभरातील विविध राज्यात सुद्धा कार्यरत असल्याचे राष्ट्रीय मार्गदर्शक विजय कुमार ठुबे यांनी या वेळेस म्हटले .

यावेळी विठ्ठलराव गायकवाड, सुरेश इंगळे, आदीनी शुभेच्छा पर मनोगते व्यक्त केली. कार्यक्रमाचे संयोजक व मराठा सेवा संघाचे पिंपरी चिंचवड अध्यक्ष अँड लक्ष्मण रानवडे यांनी प्रास्ताविक केले. तर सूत्रसंचालन उद्योग कक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश जाधव यांनी व संभाजी ब्रिगेडचे प्रदेश उपाध्यक्ष अभिमन्यू पवार यांनी आभार मानले.

वर्षा जगताप, प्रकाश बाबर, अशोक सातपुते , सुभाष देसाई, सचिन दाभाडे, शाम पाटील आदिंनी कार्यक्रमाच्या संयोजनासाठी पुढाकार घेतला

 

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button