breaking-newsमनोरंजनमुंबई

बलात्कार प्रकरणातील आरोपी करण ओबेरॉयला न्यायालयात कोसळले रडू

बलात्कार आणि ब्लॅकमेल प्रकरणात अटक करण्यात आलेला आरोपी अभिनेता करण ओबेरॉयला सोमवारी न्यायालयात सुनावणीच्यावेळी रडू कोसळले. न्यायालयाने त्याला नऊ मे पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. करणने फक्त बलात्कार आणि त्या कृत्याचे चित्रीकरणच केले नाही तर ते व्हिडिओ सार्वजनिक करण्याची धमकी देऊन तो पैसेही उकळत होता असे पीडित महिलेने एफआयआरमध्ये म्हटले आहे.

करणचे २०१६ पासून महिलेबरोबर प्रेम प्रकरण सुरु होते. लग्नाचे आश्वासन देऊन त्याने महिलेवर बलात्कार केला. ओशिवारा पोलीस स्थानकातील एफआयआरनुसार, ऑक्टोबर २०१६ मध्ये एका डेटिंग अॅप्लिकेशनद्वारे दोघांची ओळख झाली होती. त्यानंतर दोघांची मैत्री झाली. पीडितेने सांगितल्यानुसार, एक दिवस आरोपीने भेटण्यासाठी त्याच्या फ्लॅटमध्ये बोलावलं. येथे आरोपीने लग्नाचं वचनही दिलं. यादरम्यान आरोपीने नारळ पाणी दिलं होतं, ते पाणी प्यायल्यानंतर थोड्याच वेळात तिला चक्कर आली.

त्यानंतर आरोपीने बलात्कार केला आणि घटनेचा व्हिडिओही बनवला असा आरोप पीडित महिलेने केला आहे. त्या व्हिडिओद्वारे आरोपी सातत्याने ब्लॅकमेल करत होता आणि पैसे उकळत होता आणि लग्नाबाबत विचारणा केल्यास केवळ टाळाटाळ करत होता. काही दिवसांपूर्वी मी लग्नासाठी दबाव टाकला असता त्याने धमकी देऊन जे करायचं असेल ते कर असं म्हटलं. यानंतरच एफआयआर दाखल करण्याचा निर्णय घेतल्याचं पीडितेने सांगितलं. दरम्यान, करण सिंह ओबेरॉयने छोट्या पडद्यावरील अनेक मालिका केल्या असून ‘जस्सी जैसी कोई नहीं’ या मालिकेतून त्याला एक स्वतंत्र ओळख मिळाली होती.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button