पिंपरी / चिंचवड

‘सेंट पॉल’ शाळेचा दहावीचा निकाल शंभर टक्के, विद्यार्थी पालकांत आनंदी वातावरण

पिंपरी, (महाईन्यूज-) – यावर्षी सेंट पॉल शाळेचा इयत्ता दहावीचा निकाल शंभर टक्के लागला आहे. दहावीच्या उत्तीर्ण सर्व विद्यार्थ्यांचे शाळा व्यवस्थापनाकडून अभिनंदन करण्यात आले. विद्यार्थ्यांच्या पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या.

चिंचवड येथील मोहननगरमध्ये सेंट पॉल शाळा आहे. या शाळेत इयत्ता दहावीची यावर्षी पहिली बॅच भरवण्यात आली. पहिल्या वर्षात दहावीचे सर्वच्या सर्व विद्यार्थी चांगल्या गुणांनी उत्तीर्ण झाले आहेत. त्यामध्ये दिव्यांग विद्यार्थी संचित अभंग याने उत्तम यश मिळविले. आपण अपंग असल्याची भावना त्यांच्या मनात राहाणार नाही, अशी शिस्त आणि शिकवण शाळेच्या शिक्षकांनी दिली. त्यामुळे संचितच्या गुणांमध्ये वृध्दी झाल्याचे दिसते.

सर्व उत्तीर्ण विद्यार्थ्यांच्या यशासाठी शाळेचे अध्यक्ष पीटर स्मिथ, सचिव सुवर्णमाला स्मिथ, प्राचार्य सदफ शेख, शिक्षक मुनेझा पानसरे, आम्रपाली सावंत, स्वाती बेनुरे यांनी परिश्रम घेतले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button