breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

टोळक्यांचा धुडगूस सुरुच ; नेहरुनगर, विठ्ठलनगरमध्ये दहशत

पिंपरी – नेहरूनगर, विठ्ठल नगर परिसरात 10-12 जणांच्या टोळक्याने हातात शस्त्र घेऊन धुडगूस घातला. रस्त्याच्या बाजूला उभी केलेली वाहने फोडत तीन जणांवर वार देखील केले. ही घटना मंगळवारी (दि. 15) रात्री साडेदहाच्या सुमारास घडली. 

गणेश रामदास नेहरकर (वय 39, रा. नेहरूनगर, पिंपरी) यांनी याप्रकरणी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार अज्ञात तरुणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नेहरकर आणि संभाजी भगवान म्हस्के (वय 36, रा. नेहरूनगर, पिंपरी) या दोघांना टोळक्याने मारहाण करत त्यांच्यावर शस्त्राने वार केले.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी रात्री साडेदहाच्या सुमारास 10-12 जणांचे टोळके विठ्ठल नगर परिसरातील वाहनांची तोडफोड करीत होते. दरम्यान, नेहरकर कामावरून घरी जात होते. टोळक्याने नेहरकर यांना अडवून बेदम मारहाण केली. त्यांच्यावर धारदार शस्त्राने वार केले. तसेच म्हस्के यांना देखील मारहाण करण्यात आली आहे. दुचाकी, रिक्षा आणि कार अशा एकूण 10-12 वाहनांच्या काचा फोडल्या. यामध्ये वाहनांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. विठ्ठलनगर परिसरासह संतोषी माता चौक, क्रांती चौक या भागातही टोळक्याने धुडगूस घातला. अधिक तपास पिंपरी पोलिस करीत आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button