breaking-newsमहाराष्ट्र

रामराजे-उदयनराजेंचा वाद शिगेला, पुतळा जाळून रामराजेंचा निषेध

बारामती-इंदापूरला ज्यादा पाणी देण्यावरून खासदार उदयनाराजे भोसले आणि विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर यांच्या वादाने शनिवारी हिंसक वळण घेतले. उदयनराजेंवर टीका केल्याने त्यांच्या समर्थकांनी पोवईनाका येथे रामराजेंचा पुतळा जाळून निषेध केला.

नीरा देवघर धरणाच्या पाण्यावरून राजकारण जोरदार तापलेले असताना उदयनराजे भोसले यांनी १४ वर्षे बारामती-इंदापूरला ज्यादा पाणी देण्यावरून रामराजे नाईक निबाळकरवर जोरदार टीका केली होती. त्याला उत्तर देताना रामराजेंनीही कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात व पत्रकार परिषदेत खासदार उदयनराजे, खासदार रणजीतसिंह नाईक निंबाळकर व आमदार जयकुमार गोरे यांच्यावर जोरदार टीका केली होती.

‘कोणी कोणाचे पाणी पळविलेले नाही, रामराजेंनी पाण्याबाबत कधीही राजकारण केलेले नाही. मात्र, आमचे स्वयंघोषित छत्रपती खासदार उदयनराजे भोसले काही चक्रमांना घेऊन भलते सलते आरोप करीत आहेत,’ अशी बोचरी टीका रामराजे यांनी काल केली होती.

मात्र, ही टीका सहन न झाल्याने उदयनराजे समर्थक आणि राजे प्रतिष्ठानच्या कार्यकर्त्यांनी साताऱा शहरातील पोवईनाका येथे रामराजे नाईक-निंबाळकर यांचा पुतळा जाळून निषेध नोंदवला. राजे प्रतिष्ठानचे नितीन शिंदे, संतोष घाडगे यांनी हा प्रकार केला. दरम्यान, नितीन शिंदे यांना पोलीसांनी ताब्यात घेतले आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button