breaking-newsपिंपरी / चिंचवड

वाढदिवसाचा खर्च टाळून कैलास बारणे यांनी दिला पर्यावरण पुरकतेचा ‘संदेश’

  • वृक्षांचे संगोपण आणि संवर्धनाचा दिला संदेश
  • नागरिकांना कचरा संकलनाची लावली शिस्त

पिंपरी, (महाईन्यूज) – पिंपरी-चिंचवड महापालिकेतील अपक्ष आघाडीचे गटनेते कैलास भालचंद्र बारणे यांच्या वाढदिवसानिमित्त अवांतर खर्च टाळून प्रभाग क्रमांक 23 (थेरगाव)मध्ये पर्यावरण संवर्धनाला चालणा देणारे भरगच्च उपक्रम राबवून समाजात सौहार्दतेचा संदेश देण्यात आला.

  • अपक्ष आघाडीचे नगरसेवक कैलास उर्फ बाबा भालचंद्र बारणे यांचा आज वाढदिवस आहे. एरव्ही वाढदिवस म्हटले की, पार्ट्यांवर ताव मारणे आणि डीजे-डॉल्बीवर धांगडधिंगा घालण्याची परंपरा सर्वश्रुत आहे. राजकीय क्षेत्रातील व्यक्तीचा वाढदिवस असेल तर शहरभर झळकणारे होर्डींग्ज आणि गल्लोगल्ली फ्लेक्सवर स्वतःची प्रतिमा लावण्याचा प्रकार सगळीकडेच सुरू असतो. यावर होणारा अवाढव्य खर्च वाया जाणारा असतो. त्यामुळे कैलास बारणे यांनी या संस्कृतीचे पतन करून अनोखा उपक्रम राबविण्याचा आदर्श घडविला आहे.

वाढदिवसानिमत्त आज सकाळी थेरगाव येथील ग क्षेत्रीय कार्यालयाच्या समोरील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला बाबांच्या हस्ते पुष्पहार घालण्यात आला. यावेळी पिंपरीतील बालशाहीर जनजागृती पथकातील बालशाहिरांनी शिवाजी महाराजांचा इतिहास सांगणारे पोवाडे गायले. जिजाऊ, छत्रपती शहाजी आणि छत्रपती संभाजी राजे यांच्या कर्तृत्ववान इतिहासाची साक्ष देणा-या प्रसंगावर बालशाहिरांनी शाहिरी थाटात पोवाड्यांचे गायन केले.

  • त्यानंतर पर्यावरण संवर्धनाचा संदेश देण्यासाठी बाबांच्या हस्ते प्रभागात लावलेल्या वृक्षांचे संगोपण करण्यासाठी खत घालण्यात आला. वृक्षांची लागवड केल्यानंतर त्याकडे पाठ फिरवणा-या नागरिकांना त्यांनी वृक्ष संगोपनाचा धडा उपक्रमाच्या माध्यमातून दिला. तसेच, स्वीस काऊंटी सोसायटीमधील नागरिकांना कचरा संकलनासाठी स्वच्छ भारत अभियानांतर्गत डस्टबीन वाटप करण्यात आले. प्रभागातील अपंग ज्येष्ठ नागरिक, महिला, तरुण, मुलांचा उपक्रमांमध्ये उत्साही सहभाग होता.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button