breaking-newsआंतरराष्टीय

पाकिस्तानचे माजी पंतप्रधान नवाझ शरीफ यांच्याविरुद्ध नवे अटक वाॅरंट जारी

पाकिस्तानच्या एका न्यायालयाने देशाचे माजी पंतप्रधान नवाझ शरीफ यांच्याविरोधात नवे अटक वाॅरंट जारी केले आहे. 34 वर्षांपूर्वीच्या पंजाब प्रांतातील एका भूमीअधिग्रहणाबाबत नवाझ यांना दोषी ठरवण्यात आले आहे. त्यावेळी म्हणजे 1986 मध्ये नवाझ पंजाब प्रांताचे मुख्यमंत्री होते. या बेकायदा भूमी अधिग्रहण प्रकरणी जंग-जियो मीडिया समूहाचे मालक मलिक मीर हे सहआरोपी आहेत. शरीफ यांनी आपल्या अधिकाराचा गैरवापर करीत लाहोरमधील सरकारी जमीन अधिग्रहित केली असा आरोप ठेवत लाहोरच्या जबाबदेयी न्यायालयाने शरीफ आणि अन्य आरोपींविरुद्ध अटक वाॅरंट काढले आहे. नवाझ शरीफ सध्या लंडनमध्ये उपचार घेत आहेत. त्यामुळे लाहोर पोलिसांनी नवाझ यांच्या देश आणि विदेशातील सर्व निवासांवर हे अटक वाॅरंट पोचवण्याचे आदेश न्यायमूर्ती असद अली यांनी दिले आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button