breaking-newsताज्या घडामोडीपुणे

“सुजय डहाके ते वक्तव्य मागे घ्या नाहीतर…”; ब्राह्मण महासंघाचा इशारा

ब्राह्मण कलाकारांबद्दल दिग्दर्शक सुजय डहाकेने केलेलं वक्तव्याचा ब्राम्हण महासंघाने निषेध केला आहे. “डहाके यांचे वक्तव्य हे निव्वळ मूर्खपणाचं आहे. मनोरंजन क्षेत्रामध्ये जातीयता पसरवण्याचा हा उद्योग आहे,” अशी टीका ब्राम्हण महासंघाचे संस्थापक अध्यक्ष आनंद दवे यांनी केली आहे. “मराठी मनोरंजन क्षेत्रातील प्रत्येक मालिकेमध्ये मुख्य भूमिकेमध्ये ब्राह्मण मुलीच दिसतात. मग इतर मराठी मुली का नाही?”; असा सवाल ‘केसरी’ चित्रपटाचा दिग्दर्शक असणाऱ्या सुजयनं उपस्थित केला होता.

‘एका ऑनलाइन वृत्तपत्राला’ दिलेल्या विशेष मुलाखतीत सुजयने केलेल्या या वक्तव्यावरुन आता मनोरंजन क्षेत्रातील अनेक कलाकार व्यक्त होऊ लागले आहेत. त्याच पार्श्वभूमीवर ब्राम्हण महासंघाने आपली भूमिकाही स्पष्ट केली आहे. “ब्राह्मण कलाकारांबद्दल जे वक्तव्य केलंय त्याचा आम्ही तीव्र निषेध करतो. निव्वळ मूर्खपणाचं हे विधान आहे. चित्रपट क्षेत्रामध्ये जातीयता पसरवण्याचे हे उद्योग आहेत. प्रसिद्धीसाठी सुजय डहाकेने हे विधान केलेलं आहे असं आमचं स्पष्ट म्हणणं आहे,” असे मत दवे यांनी या प्रकरणाबद्दल बोलताना नोंदवले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button