breaking-newsताज्या घडामोडीमनोरंजन

सुशांतचा ‘दिल बेचारा’ पाहून अंकिता झाली भावूक; चित्रपटाच्या पोस्टरला दिलं हे कॅप्शन

अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येला जवळपास 40 दिवस पूर्ण झाले आहेत. तरी देखील सुशांतला त्याच्या चाहत्यांनी आणि कुटुंबीयांनी मनात ठेवलं आहे. त्याची एक झलक पाहण्यासाठी आतुर असलेल्या त्याच्या चाहत्यांना ‘दिल बेचारा’ चित्रपटाच्या माध्यमातून ती संधी मिळाली. २४ जुलै रोजी सुशांतचा अखेरचा चित्रपट ‘दिल बेचारा’ ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित झाला. चाहत्यांनी देखील त्यांच्या चित्रपटाला भरभरून प्रतिसाद दिला.

याच पार्श्वभूमीवर सुशांतची पूर्वाश्रमीची प्रेयसी अर्थात एक्स गर्लफ्रेंड अंकिता लोखंडेने सोशल मीडियाच्या माध्यमातून एक भावूक पोस्ट केली. अंकिताने इंन्स्टाग्रामवर चित्रपटाचा पोस्टर शेअर करत एक भावूक पोस्ट लिहिली आहे.

‘पवित्र रिश्ता मालिकेपासून ते दिल बेचारा चित्रपटापर्यंत… एकदा शेवटचं…’ चित्रपटाच्या पोस्टरला असं भावूक कॅप्शन देत तिने सुशांतसोबत असलेल्या जुन्या आठवणींना उजाळा दिला आहे. जवळपास सहा वर्ष अंकिता आणि सुशांत रिलेशनशिपमध्ये होते.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button