breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

लोणावळा येथील उपजिल्हा रुग्णालयासाठी पार्थ पवार यांचा पाठपुरावा

आमदार सुनील शेळके यांच्यासोबत प्रस्तावित जागेची पाहणी

शासकीय परवानग्या आणि निधीसाठी शासनाकडे पाठपुरावा

मावळ । प्रतिनिधी

कान्हे व लोणावळा येथे राज्य सरकार आणि स्थानिक प्रशासनाच्या समन्वयातून उपजिल्हा रुग्णालय उभारण्यात येणार आहे. या प्रस्तावित रुग्णालयाच्या जागेची पाहणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे युवा नेते पार्थ पवार यांनी केली. यावेळी स्थानिक आमदार सुनील शेळके उपस्थित होते.

प्रस्तावित उपजिल्हा रुग्णालय जागेची पाहणी, बांधकाम आराखडे, तांत्रिक बाबींची माहिती  घेण्यात आली. तसेच,  लवकरात लवकर काम सुरू होण्यासाठी आवश्यक असणाऱ्या शासन परवानग्या, निधी यासाठी पाठपुरावा करणार असल्याचे पार्थ पवार यांनी यावेळी सांगितले.

‘मावळ तालुक्याच्या लोकसंख्येचा विचार करता अद्ययावत शासकीय रुग्णालय असणे गरजेचे असल्याने शासकीय रुग्णालयातून सर्व प्रकारची यंत्रणा परिपूर्ण केल्यास ही रुग्णालये सर्वसामान्य कुटुंबासाठी इतर रुग्णालयांपेक्षा चांगल्या सेवा देऊ शकतील. कोरोना सारख्या संकटात याची प्रकर्षाने उणीव सर्वांना जाणवली आहे. त्यामुळे पुढील काळात तातडीने पावले उचलीत काम लवकर सुरू व्हावे यासाठी प्रयत्नशील आहोत. तालुक्यातील आरोग्य व्यवस्था कशी बळकट करता येईल यावर विस्तृत आराखडा बनविणे गरजेचे आहे. सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेचे सक्षमीकरण करण्याची मोठ्या प्रमाणात गरज आहे,  असे यावेळी आमदार सुनील शेळके यांनी सांगितले आहे

यावेळी लोणावळा नगरपरिषदेचे मुख्याधिकारी रवी पवार, विरोधी पक्षनेत्या शादानभाभी चौधरी, नगरसेवक भरत हारपुडे, सिंधु परदेशी, कल्पना आखाडे, बाळासाहेब कडू, मुकेश परमार, मंजूश्रीताई वाघ व इतर मान्यवर उपस्थित होते.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button